तृतीयपंथी समुदायाच्या वतीने आम्ही जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध....
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) :- पहेलगाम (काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्याबाबत तृतीयपंथी समुदायाच्या वतीने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो याबाबतचे लेखी निवेदन मा. तहसिलदार, श्रीरामपूर यांना पिंकी गुरू शेख, अध्यक्षा, तृतीयपंथी समाजसेवा संस्था, श्रीरामपूर यांनी दिले. या निवेदनात त्यांनी या दहशतवादी कृत्याने देशाच्या शांततेला व एकात्मतेला आव्हान दिले आहे. अशा हिंसक घटनांचा कोणत्याही प्रकारे पाठिंबा देता येणार नाही असे निवेदनात म्हटले आहे.
भारत हा विविधतेत एकतेचा देश आहे आणि सर्व नागरिकांना सुरक्षिततेचा मूलभूत अधिकार आहे. आम्ही तृतीयपंथी समुदायाच्या वतीने या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो. तसेच, या घटनेतील पीडित कुटुंबीयांप्रती आमची सहवेदना व्यक्त करतो.मा. तहसिलदार, यांनी या निषेध निवेदनाची योग्य ती दखल घेऊन शासनस्तरावर आमचा संदेश पोहोचवावा, अशी विनंती.