लोयोला सदन चर्च, श्रीरामपूर यांच्या वतीने , रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख परमगुरूस्वामी पोप फ्रान्सिस यांना भावपूर्ण श्रध्दांजली....

लोयोला सदन चर्चच्या वतीने श्रद्धांजली...
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) :- रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख परमगुरूस्वामी पोप फ्रान्सिस यांना लोयोला सदन चर्च वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव यांनी पोप फ्रान्सिस यांच्या विषयी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, पोप फ्रान्सिस यांचे पदावरचे आगमन जसे अनपेक्षित होते. तसेच त्यांचे ईस्टरच्या नंतरचे म्हणजे सोमवारी झालेले त्यांचे निधनही आहे त्यांची राहणीमान साधे होते. गरीबा विषयी अपार प्रेम होते.चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एक वेगळा ठसा उमटविला होता. जगभरातील दौऱ्यांनी सर्वांचा विश्वास संपादन केला होता. ख्रिस्ती धर्माच्या 2000 वर्षाच्या इतिहासात 265 पोप होऊन गेले आहेत त्या सर्वांमध्ये त्यांचे जीवनमान अतिशय साधे होते. भारतातील ख्रिस्तीजन आणि इतरही त्यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा करीत होते. याप्रसंगी चर्चशी संलग्न सर्व सेवक प्रतिनिधी महिला मंडळ युवक मंडळ सेंट लुकच्या सर्व सिस्टर्स,राफेल भवनच्या सर्व सिस्टर्स,गायन मंडळ, उत्सव समितीचे सर्व सदस्य,फादर हान्स स्टाफनर सदस्य व सर्व ख्रिस्ती भाविक उपस्थित होते. भाविकांच्या वतीने देखील श्रद्धांजली वाहण्यात आली.