नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण पुरोहित तर कार्याध्यक्षपदी बन्सी भाऊ एडके.

बालाजी देडगाव (तालुका प्रतिनिधी):-- नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण पुरोहित
तर कार्याध्यक्ष पदी बन्सी भाऊ एडके
यांच्या बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शनिवार दि.२८ जानेवारी रोजी वडाळा येथील २४ बाय ७ फूडमॉल सभागृहात पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष प्रा.सुनील गर्जे यांचे अध्यक्षतेखाली वार्षिक सभा संपन्न झाली.अध्यक्ष पदासाठी बाळकृष्ण पुरोहित, बंशी एडके,कारभरी गरड,
रमेश शिंदे,दादा निकम,गणेश घाडगे,सोपान भगत हे इच्छुक होते.मात्र सर्वानी माघार घेतल्याने अध्यक्ष पदी श्री.पुरोहित व कार्याध्यक्ष पदी श्री.एडके यांची एकमताने निवड करण्यात आली.
पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे,कुटुंबाचा आरोग्य विमा घेणे,पत्रकार दिन कार्यक्रम एकत्र करणे,शासन दरबारी पत्रकारांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे,पत्रकार भवन बांधणे, पत्रकारांचे हिताचे निर्णय घेणे याबाबींवर यासभेत चर्चा झाली.
संघटनेचे मार्गदर्शक सुखदेव फुलारी यांनी प्रस्ताविकातून संघाचे कामकाजा बाबद माहिती देऊन भूमिका स्पस्ट केली. माजी अध्यक्ष विनायक दरंदले,अशोक
डहाळे, प्रा.सुनील गर्जे,कारभारी गरड,बाळासाहेब नवगिरे,शंकर नाबदे,मोहन गायकवाड,सोमनाथ कचरे, राजेंद्र वाघमारे,सोपान भगत, काका नरवणे,सुनील पंडित आदिनी चर्चेत सहभाग घेऊन विधायक सूचना केल्या.
माजी अध्यक्ष संदीप गाडेकर,
अनिल गर्जे,मकरंद देशपांडे,संजय वाघ, इस्माईल शेख,नामदेव शिंदे,सुधाकर होंडे,अरुण सोनकर,इकबाल शेख,पवन गरुड,विठल उदावंत,प्रवीण तिरोडकर,ज्ञानेश्वर
चौधरी,अशोक पेहकर,सतीश उदावंत,संतोष सोनवणे,रमेश पाडळे,राहुल कोळसे,अशोक तुवर,अभिषेक गाडेकर , युनूस पठाण आदी सहतालुक्यातील साठहुन अधिक पत्रकार उपस्थित होते. पुढील बैठकीत उर्वरित कार्यकारणीची निवड करण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित यांनी सांगितले.