देडगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
प्रथमता ग्रामपंचायत येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत व कर्तव्यदक्ष ग्राम विकास अधिकारी संतोष उल्हारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची प्रभात फेरी काढत प्रजासत्ताक दिनाच्या घोषणा देत प्रभात फेरी पूर्ण केली.
जिल्हा परिषद केंद्र शाळेतही प्रमूख मान्यवरांच्या उपस्थितीत व उपध्यापिका तेजश्री निमसे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ध्वजाला सन्मानपूर्वक सलामी देऊन हा राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेची मुलांची भाषणे व भारत माता,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, अशा अनेक महापुरुषांची वेशभूषा परिधान करून त्यांची कला सादर करण्यात आली. व शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोसले सर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आलेल्या प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी मा उप सभापती कारभारी चेडे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, ज्ञानेश्र्वर कारखान्यांचे संचालक जनार्दन कदम, बन्सी मुंगसे, तलाठी बालाजी मलदोडे, देवकाते मेजर, काळे मेजर, संभाजी काजळे, अरूण वांधेकर, बाळासाहेब बनसोडे, संभाजी मुंगसे, देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, युवा नेते नीलेश कोकरे, मच्छिंद्र मुंगसे, भारत कोकरे,
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान मुंगसे, उप अध्यक्ष अन्वर सय्यद, दत्ता मुंगसे, महादेव पुंड, सचिन हिवाळे, झाकीर पठाण,पास्टर मनुवेल हिवाळे, नांगरे गुरूजी, बथूवेल हिवाळे सर, धामणे सर, श्रीमती करांडे मॅडम, श्रीमती कदम मॅडम, अंगणवाडी सेविका व मदतनीस , ग्रामपंचायत कर्मचारी, शाळेचे सर्व शिक्षक वृंद व गावातील आदी मान्यवर उपस्थित होते.