'पत्रकार सागर दोंदेंना पोलिस संरक्षण द्या'
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली निवेदनाद्वारे मागणी
राहुरी : दैनिक सार्वमंथन वृत्तपत्राचे उपसंपादक सागर दोंदे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली असल्याची घटना दिनांक २४ जानेवारी रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. भविष्यात त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आज (दि.२७) राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांसह तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैनिक सार्वमंथन वृत्तपत्राचे उपसंपादक सागर दोंदे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी राहुरी ते ताहाराबाद रस्त्यावर गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली असल्याची घटना दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तीविरोधात राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. वर्तमानकाळात त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यांना पोलीस संरक्षण तात्काळ मिळाले पाहिजे, अशी मागणी वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. मात्र सद्यस्थितीला कोणतेही माध्यमे सुरक्षित राहिलेले नाही. अनेक पत्रकार बांधव सामाजिक व राजकीय विषयांना वाचा फोडतात. मात्र त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पत्रकारिता करत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असल्याने आज भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकार देखील सुरक्षित नाही. असे या घटनेद्वारे पुन्हा अधोरेखित केले आहे.
स्वतः पत्रकार सागर दोंदे यांनी पोलिस ठाण्यामध्ये घडलेल्या घटनेबाबत अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरी कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहावी म्हणून घडलेल्या घटनेची प्रशासनी सखोल चौकशी करून अज्ञात व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी विनंती लेखी निवेदनाद्वारे प्रशासनकडे केली आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या जीवितास कोणती हानी पोहोचू नये. याबाबत योग्य ती दखल घ्यावी व तात्काळ पत्रकार दोंदे यांना पोलिस संरक्षण द्यावे, अन्यथा प्रशासनाविरोधात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, याची प्रशासनाने दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा संघटक निलेश जगधने, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विजय मकासरे, जिल्हा प्रवक्ते डॉ. जालिंदर घिगे, तालुका महासचिव संदीप कोकाटे, तालुकाध्यक्ष संतोष चोळके, जिल्हा महासचिव अनिल जाधव, तालुका उपाध्यक्ष गणेश पवार, शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे, युवा शहराध्यक्ष महेश साळवे, जिल्हा महिला आघाडी महिलाध्यक्ष वर्षाताई बाचकर, जिल्हाध्यक्ष छायाताई दुशिंग, विनायक विधाटे, बाळासाहेब जाधव यांसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.