महा पावन गणपतीच्या परिसरात 111 वडाच्या झाडाचा पहिला वाढदिवस देडगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा.

महा पावन गणपतीच्या परिसरात 111 वडाच्या झाडाचा पहिला वाढदिवस देडगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे महापावन गणपती परिसरातील 111 झाडाचा प्रकल्प श्री पावन गणपती वडराई प्रोजेक्ट जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगर व जय हिंद वृक्ष बँक अहमदनगर यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.

          हा वाढदिवस सोहळा जयहिंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव पालवे मेजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी पठाडे मेजर यांनी केले .प्रास्ताविकात त्यांनी जय हिंद फाउंडेशन च्या कामाबद्दल माहिती देत जिल्हाभरात ज्या ज्या ठिकाणी वृक्षाची गरज आहे .त्याची गरज ओळखून त्या ठिकाणी, झाडे लावण्याचे काम हे फाउंडेशन करत आहे .आज देडगाव येथे मागील वर्षी 111 वडाची झाडे लावली होती. व ती झाडे जबाबदारीने सांभाळून, सर्वची सर्व झाडे मोठ्या आनंदाने डौलत आहे. या पुढील काळात नक्कीच देडगाव , माका पाचुंदा, महालक्ष्मी हिवरा ,तेलकुडगाव, परिसरात पर्यटन क्षेत्र होईल. हा आमचा मेजर संघटनेचा ध्यास आहे. आम्ही मेजर ध्येयवेडे आहोत .या शब्दात आपले विचार मांडले.

     यानंतर देडगावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे ,शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र मस्के, अहिल्याबाई होळकर शाळेचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड ,माऊली गोयकर, जेष्ठ पत्रकार बन्सी एडके या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

      यावेळी जय हिंद फाउंडेशन ,उपस्थित मान्यवर व ब्राह्मणांच्या हस्ते पुजा केली. नंतर आजी-माजी सैनिक व प्रतिष्ठित मान्यवरांचा जय हिंद फाउंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी  शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र मस्के यांचा वाढदिवस असल्याने वाढदिवस निमित्त त्यांनी आधार सेवा फाउंडेशनचे  जयवंत मोटे  यांना पाच हजार रुपये देणगी देऊन या आधार सेवेला  हातभार लावला.

      या 111 वडाच्या झाडाच्या वाढदिवस निमित्त ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, बाळदेवा तांदळे,माजी सभापती कारभारी चेडे ,शिवाजीराव गर्जे मेजर, आधार सेवा फाऊंडेशनचे जयवंत मोटे,कुंडलिक दादा कदम, माका गावचे माजी सरपंच रामदास घुले, ग्रामपंचायत सदस्य अशोकराव मुंगसे संभाजी मुंगसे पाचुंदा गावचे उपसरपंच बंडू गोपने , माजी चेअरमन बाबसाहेब मुंगसे,गुलाब भाई शेख कृष्णा काकडे, गहिनीनाथ पठाडे, देवराव मुंगसे, बन्सी कुटे, रामभाऊ काजळे, महेश काळे, काकासाहेब काळे, युवा नेते निलेश कोकरे युवा नेते आकाश चेडे तक्ष शिला शाळेचे प्राचार्य खाटीक सर, शिक्षक दहातोंडे सर ,मधुकर तांदळे, उद्धव तांदळे ,नवनाथ मुंगसे व तक्षशीला शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर महिला भगिनींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर, आभार शिवाजीराव पठाडे मेजर यांनी मानले

.