राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे विरोधात न्यायालयात जाणार राजु आढाव .
महाराष्ट्रात गाजलेले राहुरी लुक्यातील तांभेरे येथील निळा झेंडा कापून टाकल्या प्रकरणात आपल्या विरुद्ध आंदोलन केल्याचा तसेच वरीष्ठांकडे तक्रार केल्याचा राग मनामध्ये धरून अधिकाराचा व पदाचा गैरवापर करून मा.न्यायालयाची दिशाभूल फसवणूक व विश्वासघात करून एफ आय आर दाखल नसताना चौदा मागासवर्गीय लोकांवर साध्या कागदावरील फिर्याद व पोलीस रिमांड दाखल करून चार दिवसाचे पोलीस रिमांड घेवून बेकायदेशीर डांबून ठेवून खोटी व बनावट फिर्याद दाखल केली म्हणुन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे तपासी अधिकारी मधुकर शिंदे बिट हवालदार ज्ञानदेव गर्जे कोर्ट ॲडली ताके यांचेवर व संबंधित दोषींवर ॲट्राॅसिटी ॲक्ट प्रमाणे व भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लीकन सेनेचे जिल्हा प्रमुख राजु आढाव यांनी राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, गृह सचिव ,अप्पर पोलीस महासंचालक नागरी हक्क संरक्षण, पोलीस महानिरीक्षक नाशिक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत राजु आढाव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहीती वरून व निवेदनाद्वारे मिळालेल्या माहीती नुसारसविस्तर हकीकत अशी की राहूरी तालुक्यातील तांभेरे या गावी आंबेडकरी मागासवर्गीय महिला पुरुष तरूनांनी एकत्र येवून ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये समतेचे प्रतीक असलेला निळा झेंडा खांब रोवून लावला याचा राग गावातील काही जातीयवादी मानसिक प्रवृत्तीच्या लोकांनी गाव बंद ठेवून मागासवर्गीय समाजावर बहिष्कार टाकला व त्यांना जीवनावश्यक वस्तू किराणा, पाणी ,औषधे गोळ्या , दळून देणे बंद केले, दुध घेणे ,मजुरांना काम बंद शाळा बंद करून दि 16/3/2022 ते 23/3/2022पर्यंत बहिष्कार टाकला याबाबत आंबेडकरी समाजाने तहसीलदार फसियोद्दीन शेख पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार करून ही संबधित दोषींवर कारवाई न करता बहिष्कार टाकणा-यांशी संगनमत करुन सदरचा गुन्हा दडपण्यासाठी पर्यायी जागा देतो म्हणून झेंडा दुसरीकडे लावून पहिला झेंडा प्रताप दराडे यांनी आपल्या पोलीस कर्मचा-यासह कापून टाकला म्हणून आंबेडकरी मागासवर्गीय समाजाने व काही सामाजिक संघटनांनी झेंडा कापणारावर कारवाई करा म्हणून दोन दिवस बेमुदत धरणेआंदोलन तहसील कचेरी वर करून दि 12/4/2022रोजी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे लेखी तक्रार केली त्याच दिवशी आंबेडकरी समाजाने दराडे यांनी कापून टाकलेल्या ठीकाणी त्याच जागेवर निळा झेंडा लावला याचा व आपल्या विरुद्ध आंदोलन केल्याचा तसेच वरीष्ठांकडे तक्रार केल्याचा राग मनामध्ये धरून बिट हवालदार ज्ञानदेव गर्जे यांच्याशी व गावातील काही झेंड्याला विरोध करणा-यांशी संगनमत करुन झेंडा लावलेल्या मागासवर्गीय महिला पुरुषांना अटक करून पोलीस स्टेशनला आणण्यासाठी पो. ह. गर्जे यांना सांगितले त्यासाठी पंधरा सोळा पोलीस व पोलीस अधिकारी पाठवले त्यांनी 19महिला 14पुरुषांना अटक करून पोलीस स्टेशनला घेवून आले तदनंतर त्याच रात्री दि 12/4/2022ला एकोणीस महिला व चौदा पुरुषां विरुद्ध साध्या कागदावर फिर्याद घेवून चौदा मागासवर्गीय पुरुषांना रात्रीची एफ आय आर दाखल नसताना अटक केली ऊर्वरित एकोणीस महिलांना फौजदारी प्रक्रिया संहिता 46/4 ऊलंघन करून रात्री एक वाजे पर्यंत एफ आय आर दाखल नसताना जूलूम जबरदस्तीने ताब्यात ठेवून 41प्रमाणे नोटीस बजावली व सोडून दिले दुस-या दिवशी 13/4/2022 रोजी प्रताप दराडे तपासी अधिकारी मधुकर शिंदे बिट हवालदार ज्ञानदेव गर्जे कोर्ट अडली ताके यांनी संगनमत करून एफ आय आर दाखल नसताना साध्या कागदावरील फिर्याद व पोलीस रिमांड दाखल करून चारदिवसाचे दि. 16/4/2022 रपर्यंत पोलीस रिमांड पुन्हा एका आरोपी साठी पुन्हा न्यायालयाची फसवणूक दिशाभूल करून दि. 14/4/2022 रोजी पोलीस रिमांड दाखल करून 16/4 पर्यंत पोलीस रिमांड घेतले या दोन्ही ही रिमांड मिळविल्या नंतर दि 15/4/2022रोजी रात्री आठ वाजून चौरेचाळीस मि.एफ आय आर राहूरी पोलीस स्टेशनला दाखल झाला त्याचा गुन्हा रजि. नं 291/2022 असा आहे तदनंतर त्याच रात्री ग्रामसेविका सोनाली पाटोळे यांची एकाच घटनेची दुसरी फिर्याद नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी घेतली अशा एकाच घटनेच्या तिन फिर्यादी घेवून अजब कारभार कर्तव्यदक्ष दराडे साहेबांनी केला आहे मा.न्यायालयाची दिशाभूल फसवणूक व विश्वासघात करून एफ आय आर दाखल नसताना साध्या कागदावरील फिर्यादीवर मागासवर्गीय आंबेडकरी समाजावर दहशत निर्माण करण्यासाठी चौदा लोकांवर चार दिवसांची पोलीस कोठडी घेवून जबर मारहाण करून अन्याय अत्याचार करून बेकायदेशीर डांबून ठेवून खोटी व बनावट कपोलकल्पित फिर्याद दाखल करून पाच दिवस कोठडीत डांबून ठेवले असल्याचे कागदोपत्री सिध्द होत असल्याने रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख राजू आढाव यांनी ॲट्राॅसिटी ॲक्ट प्रमाणे व भारतीय दंड संहितेनुसार संबंधित कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सह संबंधित दोषींवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे या प्रकरणी कारवाई न झाल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन केले जाणार असुन उच्च न्यायालयातही लवकरच याचिका दाखल करणार असल्याची माहिती राजू आढाव यांनी दिली आहे .