लोणी येथे विना नंबर डंपरांचा सुळसुळाट; प्रशासनाचा आशीर्वाद की दुर्लक्ष?

लोणी येथे विना नंबर डंपरांचा सुळसुळाट; प्रशासनाचा आशीर्वाद की दुर्लक्ष?

लोणी येथे विना नंबर डंपरांचा सुळसुळाट; प्रशासनाचा आशीर्वाद की दुर्लक्ष?

प्रतिनिधी : प्रसाद घोगरे _ 9370328944

अहिल्यांनगर लोणी परिसरात सध्या नगर–मनमाड महामार्गाच्या कामासाठी मटेरियल वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून विना क्रमांक डंपरांचा सुळसुळाट वाढला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, ५० पेक्षा जास्त डंपर रोज शेकडो वेळा ये-जा करत असून ही वाहतूक मुख्यत्वे लोणी कॉलेज परिसरातून होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

डंपरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मटेरियल भरले जात असल्याने स्पीड ब्रेकर, खड्डे किंवा वळणांवरून जाताना दगड-मुरूम रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सांडत आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

यातील अनेक डंपर विना नंबर प्लेट असल्याचे, एखादा अपघात घडल्यास कारवाई करणे अवघड होणार आहे. तसेच काही वाहनांच्या काचांवर महामार्ग स्टिकर लावून वाहतूक सुरू असल्याचेही दिसून येते. सुसाट वेगाने धावणाऱ्या या डंपरांमुळे शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक भयभीत झाले आहेत.

दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य वाहतूक सुरू असतानाही आरटीओ व पोलिस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सर्वसामान्यांवर त्वरित कारवाई करणारे प्रशासन येथे आशीर्वाद देते की, की दुर्लक्ष करते असा सवाल उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांनी तात्काळ तपासणी मोहीम राबवून विना नंबर व ओव्हरलोड डंपरांवर कठोर कारवाई करावी, तसेच कॉलेज परिसरात वेगमर्यादा व पोलिस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी केली आहे.