म्हैसगावच्या केदारेश्वर मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या आरोपीला राहुरी पोलिसांनी 4 तासांत गजाआड केलं*
*म्हैसगावच्या केदारेश्वर मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या आरोपीला राहुरी पोलिसांनी 4 तासांत गजाआड केलं*
*राहुरी, दि. 14 मे 2026*: राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसगाव येथील श्री क्षेत्र केदारेश्वर देवस्थान येथील दानपेटी फोडून रोख रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपीला राहुरी पोलिसांनी 4 तासांत अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मे 2026 रोजी रात्री 8 ते 15 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडून रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी गुन्हा रजि. नं. 526/2026 बीएनएस कलम 305, 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोहेकॉ रामनाथ सानप, पोहेकॉ राजू पुंड आणि पो कॉ गणेश मैड यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.
अटक केलेल्या आरोपीचे नाव दीपक राधु आंबेकर, वय 28, रा. कोळेवाडी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली








