बालाजी देडगाव येथे जननायक बिरसा मुंडा जयंती एकलव्य संघटनेच्या वतीने साजरी.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील एकलव्य संघटना शाखेच्या वतीने जननायक आदिवासी समाजाचे नेते क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती एकलव्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष श्री पवनराजे सोनवणे व प्रदेश कार्याध्यक्ष श्री सुधाकरराव वाघ यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोदराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी प्रथमतः बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून बिरसा मुंडा यांच्या नावाने जयघोष करीत घोषणा दिल्या. हा कार्यक्रम फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये संपन्न झाला व सर्वांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्राबद्दल पत्रकार युनूस पठाण यांनी माहिती देताना म्हणाले की, हे बिरसा मुंडा आदिवासी समाजाचे लोकनेते होते. त्याचा जन्म झारखंड येथिल उलीहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ साली झाला. ते पहिल्यापासून चातुर , हुशार बुद्धीचे होते . तो काळ ब्रिटिश शासनाचा होता . ते भारतीयांवर आन्याय करत होते. त्याबरोबर आदिवासी वर ही अन्याय करत होते. होणारा अन्याय थांबवण्याचा प्रयत्न केला. ते ब्रिटिश बरोबर लढले होते. त्यांना आव्हान दिल होत की, भारत सोडा नाहीतर मुडदे पाडले जातील व त्यांनी इंग्रजांवर हल्लेही केले. परंतू त्यांना ब्रिटिश सरकारने कैद केली. व त्यांच्यावर कारागृह मध्ये अन्याय ,जुलूम करत त्यांचे अतोनात हाल केले. या मध्ये त्यांचें निधन ९ जुन १९०० रोजी झाले. व क्रांतिकारक मशाल विझली.अशा क्रातीकारक, महानायक बिरसा मुंडा यांना अभिवादन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा नेते निलेश कोकरे ,भाजपा युवा मोर्चाचे आकाश चे, युवा नेते आशिष हिवाळे, देडगाव एकलव्य संघटनेचे अध्यक्ष कृष्णा मोरे, व सर्व सदस्य ,गणेश मोरे,आबासाहेब बनसोडे, वसंत मुंगसे, नितीन ससाणे, साचिन हिवाळे, शिवनेरी ग्रुपचे अध्यक्ष एकनाथ फुलारी ,एकलव्य संघटनेचे सर्व पदाधिकारी ,ब्लॅक टायगर फोर्स व देडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बिरसा मुंडा जयंती निमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचे व कार्यक्रमाचे आभार जिल्हाध्यक्ष प्रमोद थोरात यांनी मानले.