दिवस रात्र एक करून चालू केलेली पाईपलाईन योजना वॉल चोरी गेल्यामुळे पुन्हा बंद ,तात्काळ उपाययोजना करून पाईपलाईन पुन्हा चालू करणार -धनराज गाडे .
अति पावसामुळे मुळा धरणातून मुळा नदीला 25 हजार क्युसेकने पाणी सोडल्यामुळे14 गाव पाणीपुरवठा योजना नादुरुस्त झाली होती .सुमारे 21 दिवसापासून बंद असलेल्या या पाईपलाईनमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल सोसावे लागले आहे.
नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून मुळा नदीचे पाणी कमी होताच श्री . धनराज गाडे व त्यांचे सहकारी यांनी दिवस-रात्र कष्ट करून ही पाईपलाईन दुरुस्त केली .तपासणीसाठी या पाईपलाईन मधून पाणी सोडण्यात आले होते परंतु राहुरी खुर्द येथे या पाईपलाईनवर असलेला वॉल चोरीला गेल्यामुळे पाईपलाईनचे पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते .ही बाब लक्षात येताच सुरू केलेली पाईपलाईन पुन्हा बंद करण्यात आली आहे .परंतु नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी यावर त्वरित उपाय योजना करून लगेचच 14 गाव पाणी योजना सुरू करण्यात येणार असल्याचे मत धनराज गाडे यांनी व्यक्त केले आहे .