महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू असणारा निकृष्ट कामाबाबत भीम आर्मी तर्फे कुलसचिव व कुलगुरू यांना तक्रार निवेदन

महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू असणारा निकृष्ट कामाबाबत भीम आर्मी तर्फे कुलसचिव व कुलगुरू यांना तक्रार निवेदन

देशभरात नावलौकिक असणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठात निकृष्ट कामाचा सुळसुळाट झाला आहे विद्यापीठाकडून योग्य मोबदला घेऊन खडांबे रस्तावर व लेडीज होस्टेल येथे अत्यंत निकृष्ट पद्धतीने कामे चालू आहेत याबाबत भीम आर्मी जिल्हा संघटक मनोज सुंदर शिरसाठ यांनी तक्रार निवेदन दिले आहे तक्रार निवेदनात म्हटले आहे की निकृष्ट कामे करणाऱ्या अभियंत्यावर तात्काळ कारवाई करावी निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करून निकृष्ट काम केलेल्या कामाची देयके तात्काळ थांबवण्यात यावी कामाचे निवेदन दिल्यानंतर निकृष्ट कामे झाकण्याचे काम अत्यंत जलद गतीने सुरू झाले आहेत तरी कुलसचिव व कुलगुरू यांनी लक्ष घालून किंवा सार्वजनिक बांधकामाच्या सक्षम अधिकाऱ्याकडून कामाचे निरीक्षण करून योग्य कारवाई करावी अन्यथा भीम आर्मी तर्फे याबाबत आवाज उठवण्याचे काम होईल असे भीम आर्मी जिल्हा संघटक मनोज सुंदर शिरसाट यांनी सांगितले

अनेक कारणाने सतत चर्चेत असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अनेक कामांबद्दल अनेक वेळा चर्चा असतानाही प्रशासन यावर कोणतीच कारवाई करीत नाही असे दिसून आले आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विद्यापीठ प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न आहे चुकीचे काम करणाऱ्या वर विद्यापीठ प्रशासन कारवाई करेल की नाही हे भविष्यात दिसून येईल निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदार व अशा कामांना साथ देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आशीर्वाद कोणाचा अशी चर्चा सध्या विद्यापीठात सुरू आहे अतिशय सक्षम व प्रामाणिक असणारे कुलगुरू प्रशांत कुमार पाटील व कुलसचिव या निकृष्ट कामावरन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याबाबत शेतकरी व जनतेमध्ये कुजबुज आहे