राहुरी तालुक्यात पुन्हा एका पतसंस्थेचा सावळा गोंधळ.
राहुरी तालुक्यात अनेक पतसंस्था कार्यरत असून त्या पतसंस्थेमध्ये काही पतसंस्था या मनमानी कारभार करताना दिसून येत आहे.
नुकत्याच एका पतसंस्थेच्या गैरकारभाराबाबत पतसंस्था चालकांनी केलेल्या घोटाळ्यामुळे अनेक ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या
आहेत. व या पतसंस्थेच्या संचालकावर फौजदारी गुन्हे दाखल असून सध्या काही संचालक राहुरी पोलिस ठाणेच्या तुरुंगात डांबून आहेत असे असताना राहुरी तालुक्यात प्रसिद्ध असलेली राहुरी तालुका व्यापारी नागरिक सहकारी पतसंस्था राहुरी.
यांचेकडून डिग्रस तालुका राहुरी येथील शेतकरी सोपान हनुमंता बेल्हेकर यांनी कर्ज प्रकरण केले सदर पतसंस्थेचे कर्जदार यांनी वेळोवेळी हप्ते भरून कर्ज पूर्ण फेड केली आहे असे असताना नमूद पतसंस्थेने सदर कर्जदारास आपणाकडे कर्ज बाकी असल्याने ते तात्काळ भरावे व आपले कर्ज खाते निल करावी असे आशयाची नोटीस बजावणी करण्यात आली सदर कर्जदाराने हे कर्ज नील केलेले असताना अशी नोटीस आल्याने पतसंस्थेकडे विचारपूस केली असता त्यांना उडवडीची उत्तरे देण्यात आली व कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देण्यात आली म्हणून कर्जदार सोपान हनुमंता बेल्हेकर यांनी कर्जाबाबत सहाय्यक निबंध सहकारी संस्था राहुरी यांचे कडे दिनांक ०८.०६.२०२३ रोजी माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती मागवली असता सदरची माहिती पुरवणे हे नमूद पतसंस्थेकडे जबाबदारी असल्याने सदर पतसंस्थेकडून कागदपत्र मागवून घ्यावेत असे पत्र देऊन माहिती अधिकार अर्ज निकाली काढण्याचा प्रयत्न केला असता कर्जदार यांनी अपील दाखल केले व सदर माहिती अधिकारातील अपीलातही कागदपत्रे मिळवली असता सदर पतसंस्थेच्या गैरकारभाराबाबतची माहिती उघड झाली.
कर्जदार सोपान बेल्हेकर यांनी पतसंस्थेकडून त्यांनी घेतलेल्या कर्जबाबतची कागदपत्रे कर्ज खाते उतारा इत्यादीची मागणी केली असता नमूद पतसंस्थेने मागणी केलेली माहिती व कागदपत्रेदेणे ऐवजी वेगळी कागदपत्रे हातात दिली सदरची कागदपत्रे पाहता नमूद पतसंस्थेने कागदपत्रे मंजूर करून घेतले अशी कागदपत्रे नष्ट करताना शासकीय कार्यालयाची निगडित असलेली सहाय्यक निबंधक सहकारी पतसंस्था उपनिबंधक सहकारी पतसंस्था जिल्हा निबंधक सहकारी पतसंस्था यांच्या परवानगी घेणे आवश्यक असताना अशा कोणत्याही परवानगी न घेता सदरील कागदपत्रे परस्पर ठराव घेऊन नष्ट करणे बाबतची माहिती उघड झाली असे नमूद पतसंस्थेने कर्जदार सोपान बेल्हेकर यांना दिलेल्या पत्रावरून दिसून येते तसेच दिनांक २८ जून २०२३ च्या पत्रावरून नील झालेली कर्ज प्रकरणे व लेखापरीक्षण झालेले व्हाउचर नष्ट केलेले दिसून येते कर्जदार सोपान बेल्हेकर यांच्याही कर्जाचे रेकॉर्ड सदर पतसंस्थेने नष्ट केलेली आहेत असे असताना सोपान बेल्हेकर यांच्या कडून पुनश्च कर्ज वसुली बाबत कारवाई केली आहे त्यामुळे सदर पतसंस्थेचा सावळा गोंधळ चालू आहे यामुळे अनेक कर्जदारांच्या प्रकरण या पतसंस्थेने सुरू केलेल्या कारवायांमुळे .
कर्जदारांची धाबे दनानले आहेत .
व ठेवीदारांच्या ठेवीही व्यापारी नागरी पतसंस्था राहुरी कडून गफला होण्याची शक्यता नाकारता येत नाही
कर्जदारांनी या पतसंस्थेकडील आपली कर्ज प्रकरणे वेळीच तपासून घ्यावीत व ठेवीदारांनी आपल्या ठेवी हडप होण्या अगोदरच नमुद पतसंस्थेकइन काढून घ्याव्यात असे आव्हान या पतसंस्थेच्या कर्जदार खातेदार व ठेवीदार यांना श्री सोपान बेल्हेकर यांनी केली आहे.