राहुरीच्या खरेदी विक्री निबंधक कार्यालयात राजुचा झांगडगुत्ता दस्त नोंदणीधारकांची लुट; अधिकाऱ्याची मिलिभगत
राहुरीच्या दुय्यम निबंधक (खरेदी विक्री ) कार्यालयात दस्त नोंदणी नंतर भरलेल्या नोंदणी शुल्का एवढी रक्कम देवून कार्यालयातील राजु नामक व्यक्तीचा हात ओला केला नाही तर नोंदविलेला दस्त देण्याचे टाळाटाळ केली जाते. या ठिकाणी खरेदीदार, हक्कसोडपञ, गहाणखत आदीसह दस्त नोंदविणाऱ्या प्रत्येकाची अडवणूक केली जाते. दुय्यम निबंधक उघड्या डोळ्याने हा सर्व प्रकार पाहत असतानाही तोंडातुन चकार शब्द काढत नाही.उलट जो तक्रार करील त्याचा नोदविलेला दस्ताची नोंदच होत नाही. असे सांगुन त्यास दस्त नोंदीसाठी पाच ते सहा हेलपाटे मारावयास लावतात शेवटी ज्या हात ओले करतो असे सांगेल त्याच वेळेस दस्त दिला जातो.या सर्वच कर्मचारी अडवणूक करीत असल्याचे दिसत आहे.
राहुरी येथिल दुय्यम निबंधक कार्यालयात देवळाली प्रवरा येथिल पञकार हक्कसोड पञ करण्यासाठी गेले असता दस्त नोंदणी नंतर कार्यालयातील राजु नामक व्यक्तीने दस्त नोंदणीच्या दोन पट रक्कम लाच म्हणून उघड पणे मागतली जाते. राजु नामक व्यक्तीस दस्त नोंदणी शुल्क भरले असल्याचे सांगितले असताता ते तुम्ही शासनाला भरले आहे.शासनाच्या दोन पट रक्कम आम्हाला द्यावी लागते. नाहीतर नोंदविलेला दस्त रद्द केला जाईल असे सांगितले जाते. लाच मागतानाही आवाज मोठ्याने करुन बोलले जाते. या मोठ्या आवाजामुळे इतर दस्त नोंदधारक काही न बोलता मागेल तेवढी रक्कम देतात.पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दस्त नोंद धारकास जाणीवपूर्वक दस्तच द्यायचा नाही उद्या यावे लागेल . उद्या आल्यावर परवा या असे सांगुन जाणीवपूर्वक ञास दिला जात आहे.
देवळाली प्रवरा येथिल पञकार यांनी हक्कसोडपञ दस्त नोंदणी केल्या नंतर नोंदणी शुल्का ऐवढे पैसे द्यावेच लागेल असे येथिल कार्यालयातील राजु नामक व्यक्तीने सांगितले.दस्त शुल्क आँनलाईन भरलेले असल्याने जादा पैसे कशाचे द्यायचे असे विचारले असता तुमचा दस्त नोंदणी होत नाही असे सांगितले गेले. दस्त नोंद झाल्याचा त्यास मेसेज दाखविला असता दस्त नोंद झाला असला तरी तुम्हाला दस्त मिळणार नाही.तुम्ही साहेबाला पैसे द्या नाहीतर दस्तासाठी चकरा मारत बसा असे धमकी वजा दम देण्यास राजु नामक व्यक्ती मागे पुढे पाहत नाही.राहुरीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी मध्ये सर्रास लुट केली जात आहे.पैसे गोळा करण्यासाठी असलेला राजु नामक व्यक्ती दस्त नोंदणी धारकास दम देवून पैसे घेण्याचे प्रकार सर्रास वाढला आहे. हा कर्मचारी दस्त धारकास कार्यालयात दम देत असताना दुय्यम निबंधक उघड्या डोळ्याने पाहत असतात परंतू या अधिकाऱ्यांच्या तोंडातुन चिकार शब्द निघत नाही. या पञकाराने दिलेल्या पैशाचे फोटो व राजु नामक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आँडीओ क्लीप लाचलुचपत प्रतिबंधक विभागास पाठविली आहे.
चौकट
....ते पञकार कोण ?
वरिष्ठां पासुन ते तालुक्यातील पञकारांना हप्ते द्यावे लागतात.तालुक्यातील पञकार दरमहा हप्ता नेण्यासाठी येतात त्यामुळेच आम्ही नोंदणी शुल्काच्या दोन पट पैसे घेतो. आम्ही सर्वांचे हात ओले करतो त्यामुळे आमच्यावर कोणीच कारवाई करु शकत नाही.असे जाहिर पणे मोठ्या आवाजात कार्यालयातील राजु नामक व्यक्ती बोलुन दाखवत होता.