वांबोरी येथील कोळ्याच्या वाडीत अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न .

वांबोरी येथील कोळ्याच्या वाडीत अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न .

कोळ्याची वाडी वांबोरी येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न.. 

             राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील कोळ्याची वाडी येथे सालाबादप्रमाणे बजरंग बली मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला.हा सप्ताह दि.13-5-2024 ते 20-5-2024 या कालावधीत संपन्न झाला .13-5-204 रोजी ह.भ.प.संजय महाराज शेटे कणगर यांचे किर्तनाने सुरूवात करण्यात आली व 20-5-2024 रोजी सकाळी 9 ते 11 यावेळेत ह.भ.प.संत कथाकार विकास महाराज हापसे यांचे काल्याचे किर्तनाने सांगता करण्यात आली.नंतर महाप्रसादाची पंगत श्री.पंढरीनाथ गेणुजी महांडुळे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले.यावेळी काल्याच्या किर्तनाला व महाप्रसादाचा लाभ हाजारो भावीक भक्तांनी घेतला.यावेळी व्यासपीठ , हार्मोनियम,गायनाचार्य, पहारेकरी,हरिपाठ,विणेकरी, मंडप व सांऊंड सिस्टीम, लाईटचे सौजन्य या सर्वांच्या सोजन्यामुळे आसपासचा परिसर हरिमय वातावरणात पार पडला.या सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे मिरवणूक काढताना हरिनामाचा गजर पंचक्रोशीती दुमदुमला तसेच बजरंग बली मित्र मंडळ व कोळ्याची वाडी वांबोरी येथील सर्व ग्रामस्थ यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन उत्तम प्रकारे करून सप्ताहाची सांगत करण्यात आली.यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला.