आषाढी एकादशीनिमित्त भगवानगडावर उसळला भाविकांचा जनसागर.
आषाढी एकादशी निमित्ताने भगवानगडावर उसळला भाविकांचा जनसागर
आव्हाणे बु : (
प्रतिनिधी भारत भालेराव) आषाढी एकादशी निमित्ताने आज दि 29 रोजी श्री क्षेत्र भगवानगड, ता.पाथर्डी येथे भाविकांनी गडावरील स्वयंभू श्री. पांडुरंग व श्री. संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.सकाळपासूनच भावीकांची मोठी गर्दी होती अहमदनगर आणि बिड जिल्हयातील सुमारे एक लाख भावीकांनी दर्शन घेतल्याची माहिती मिळाली असुन गडाच्या वतीने ह.भ.प.डॉ.नामदेव शास्त्री यांनी येणा-या भावीकांसाठी मोठयाप्रमाणत सोयी सुविधा देण्यात आल्या होत्या. श्री क्षेत्र भगवान गड आणि परिसारामध्ये यावर्षी चांगल्याप्रकार पाऊस झाला असुन शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण होते. आषाढी एकादशी निमित्ताने या ठिकाणी अहमदनगर व बिड जिल्हयातील सुमारे एक लाख भाविकांनी स्वयंभु पांडुरंग तसेच श्री संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी मंदीराच्या समोर लांब रांगा पहावयासलागल्या होत्या गडाचे प्रधानाचार्य ह.भ.प.श्री.नारायण महाराज शास्त्री (स्वामीजी) यांच्या हस्ते गडावरील पांडुरंगाच्या मुर्तीची व बाबांच्या समाधीची महापूजा झाली, दर्शनासाठी पायी येणा-या भाविकांची मोठी गर्दी रस्त्यांने नगर आणि बिड जिल्हयांमधुन येताना दिसत होती अनेक स्वयंसेवकांनी पायी येणा-या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केली गेली असल्याने गडाच्या परीसरामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते त्याच बरोबर गडावर शेजारील भारजवाडी गावाच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तवर पोलिस निरिक्षक संतोष मुटकुळे, सहा.पोलिस निरिक्षक रामेश्वर कायंदे, पोलिस उपनिरिक्षक श्रीकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठयाप्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.