महात्मा फुले कृषी विद्यापीठात 51 वी कृषी संशोधन आणि विकास समिती बैठकीचे आयोजन .
*महात्मा फुले कृषि विद्यापीठात 51 वी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठकीचे आयोजन*
*राहुरी विद्यापीठ, दि. 22 मे, 2023*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे दिनांक 25 ते 27 मे, 2023 या कालावधीत 51 वी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे असणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मंत्री, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास तथा पालकमंत्री अहमदनगर मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील, कृषि मंत्री आणि कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा.ना.श्री. अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत चारही कृषि विद्यापीठाच्या विविध पिकांच्या वाणांना, संशोधन तंत्रज्ञानाच्या शिफारशींना तसेच सुधारीत औजारांना चर्चेअंती मान्यता देण्यात येईल. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 5 वाण, फळ पिकाचे 1 वाण, 3 यंत्रे व 74 शिफारशी, दापोली कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 2 वाण, फळ पिकाचे 1 वाण व 38 शिफारशी, परभणी कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 4 वाण, फळ पिकांचे 2 वाण, 5 यंत्रे व 46 शिफारशी, अकोला कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 3 वाण, फळ पिकांचे 2 वाण, 5 यंत्रे व 75 शिफारशी यांचा समावेश आहे. राज्यातील शेतकर्यांच्या उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने या तंत्रज्ञान शिफारशी फायदेशीर ठरतात. या बैठकीचा समारोप 27 मे, 2023 रोजी होणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी दिली.
याप्रसंगी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा.ना.श्री. प्रकाश आबिटकर, लोकसभा सदस्य खा.श्री. सदाशिव लोखंडे, खा.डॉ. सुजय विखे पाटील, आ.श्री. किशोर दराडे, आ.श्री. राम शिंदे, आ.श्री. सत्यजीत तांबे, आ.श्री. प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (कृषि) श्री. एकनाथ डवले, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री रावसाहेब भागडे, कृषि आयुक्त श्री. सुनिल चव्हाण व अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री. सिध्दाराम सालीमठ तसेच राज्यातील इतर तीनही कृषि विद्यापीठांचे कुलगुरु व शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे स्वागताध्यक्ष म्हणुन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील असणार आहेत.