राहुरीचे पोलिस निरिक्षक मेघशाम डांगे यांनी पिंप्री अवघड येथे हनुमान चालिसा कार्यक्रमास दिली भेट .

राहुरीचे पोलिस निरिक्षक मेघशाम डांगे यांनी पिंप्री अवघड येथे हनुमान चालिसा कार्यक्रमास दिली भेट .

         

       

            राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथे गेल्या सहा महिन्यांपासून गावातील हनुमान मंदिरात धर्मरुद्र प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने दर शनिवारी हनुमान चालिसा पठन हा कार्यक्रम नित्यनेमाने सुरु करण्यात आला आहे . दर शनिवारी सकाळी गावातील जेष्ठ नागरिक हनुमान मंदीरात जाऊन हनुमान चालिसा पठन करत असतात तर धर्मरूद्र ग्रुपच्या वतीने सायंकाळी हनुमान चालिसा व आरती मोठ्या उत्साहात संपन्न होत असते.

 

          धर्मरुद्र ग्रुपच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या धार्मिक उपक्रमाची चर्चा सध्या सर्वत्र होतान दिसत आहे . तसेच या ग्रुपच्या वतीने गावामध्ये व्यसनमुक्ती बरोबरच सामाजिक उपक्रमही सुरू करण्यात आले आहे . या सर्व कार्यक्रमांची दखल घेऊन राहुरीचे पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी शनिवार दि .20/05/2023 रोजी मंदिरात होणाऱ्या हनुमान चालिसा कार्यक्रमास भेट दिली . श्री . डांगे यांनी यावेळी लहान मुलांबरोबर हनुमान चालिसा पठनाचा आनंद घेतला , नंतर श्री .डांगे यांच्या हस्ते हनुमंतरायची आरती करण्यात आली व लहान मुलांना हनुमान चालिसा पुस्तकाचे वाटपही यावेळी श्री . डांगे यांच्या हस्ते करण्यात आले .

 

       उपस्थितांनी व लहान मुलांनी एका तालासुरात गायलेली हनुमान चालिसा ऐकून पो .नि . डांगे भारावून गल्याचे यावेळी दिसत होते . मुलांवर धार्मिक संस्कार घडवून एक चांगली पिढी तयार करण्याचे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम धर्मरूद्र प्रतिष्ठान ग्रुपचे तरूण करत असल्याचे श्री .डांगे यांनी यावेळी बोलतांना सांगितले आहे .

 

       यावेळी श्री . माधव लांबे, श्री . राजेंद्र लांबे, श्री . पप्पू गटकळ यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे . पोलिस निरीक्षक डांगे यांनी सर्वांचे आभार मानून धर्मरुद्र प्रतिष्ठानच्या सर्व तरुणांना पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .