नेवासा तालुक्यातील माका गावासह सर्वच गावचा सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आमदार शंकरराव गडाख
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण ) माका गावासह तालुक्यांतील प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील, नेवासा तालुक्यातील माका येथे एकाच वेळी ५ कोटी ६७ लाख रुपयांची कामे मार्गी लागली आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. मिळालेल्या मंत्रिपदाच्या संधीमुळे ही कामे आपण पूर्ण करू शकलो. जरी सत्ता गेली असली तरी माझ्यातील जे कौशल्य आहे त्या माध्यमातून मी नक्कीच विशेष प्रयत्न करून जास्तीत जास्त निधी आणून नेवासा तालुक्याचा सर्वांगीण विकास करेल. तसेच माका व परिसरातील कामे मार्गी लावण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार शंकरराव गडाख यांनी केले.
नेवासा तालुक्यातील माका येथे आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते ५ कोटी ५७ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले, यावेळी आमदार गडाख बोलत होते. जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत ३ कोटी ५० लाख रुपये खर्चाची पाणी योजना, पशुवैद्यकिय दवाखाना इमारत बांधकाम करणे ३० लाख रुपये, माजी खासदार यशवंतराव गडाख शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारत १ कोटी ६५ लाख रुपये,
महादेव मंदिर सभामंडप बांधकाम करणे ७ लाख रुपये, बाबीर बाबा (खेमनर वस्ती) सभामंडप बांधकाम करणे ५ लाख रुपये या कामांचा यामध्ये समावेश आहे. आमदार शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्नपूर्वक माका गावातील सर्वसमावेशक कामे मार्गी लावल्याबद्दल आमदार गडाख यांचा माका ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी गडाख म्हणाले, सत्तांतरानंतर तालुक्यातील अनेक कामांना स्थगिती देण्यात आली आहे. याविरोधात आपण हायकोर्टात गेलो आहोत. सदर कामे सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. नव्याने सुरू करण्यात आलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी लक्ष द्यावे
या परिसरातील विकासामुळे माजी मंत्री आमदार शंकराव गडाख यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
याप्रसंगी माक्याचे माजी सरपंच नाथाजी घुले, विद्यमान उपसरपंच अनिलराव घुले, माजी सभापती भगवानराव गंगावणे, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मणराव बनसोडे, आश्रुबा सानप यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण नांगरे भाऊसाहेब यांचा उत्कृष्ठ कार्याबद्दल आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मक्याचे विद्यमान सरपंच विजयाताई बाबासाहेब पटेकर, उपसरपंच अनिलराव घुले, माका सोसायटीचे चेअरमन डॉ. रघुनाथ पागिरे, व्हा. चेअरमन जबाजी पांढरे, मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मण पांढरे, माजी संचालक एकनाथराव जगताप, मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य ,शिक्षणभूषण बाजीराव पाटील मुंगसे, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कडूभाऊ तांबे, देडगावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे, यादवराव शिंदे, अरुणराव पालवे, कोकाटे गुरुजी, अशोकराव खेमनर, लहानू कांदे, रामभाऊ बाचकर, दिगंबर शिंदे, गंगाराम पांढरे आदींसह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व माका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्ञानदेव सानप सर यांनी केले. तर संजय गाडे यांनी उपस्थितांचे आभार मा
नले.