जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बाल गोपाळांसोबत अमोल गायकवाड यांनी केला वाढदिवस साजरा,शाळेतील विद्यार्थ्यांना केले शालेय साहित्याचे वाटप .

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बाल गोपाळांसोबत अमोल गायकवाड यांनी केला वाढदिवस साजरा,शाळेतील विद्यार्थ्यांना केले शालेय साहित्याचे वाटप .

राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील गोरगरिबांचे आधारस्तंभ असणारे अमोल गायकवाड यांनी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे .सध्या आपण पाहतो की वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक तरुण हॉटेल, डीजे किंवा पार्ट्या करून पैशांची उधळण करून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत असतात.

 

          वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च हा सत्कारणी लागावा व समाजामध्ये त्याची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी या तरुणाने आपल्या वाढदिवसानिमित्त गावात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याची इच्छा शाळेतील मुख्याध्यापक यांना व्यक्त केली .मुख्याध्यापकांनीही या निर्णयाचे कौतुक केले व ठरल्याप्रमाणे वाढदिवस हा शाळेत साजरा करण्यात आला .यावेळी शाळेच्या वतीने अमोल गायकवाड यांचे प्रथम शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला .

             या वेळी अमोल गायकवाड या तरुणाने शालेय साहित्य स्वतःच्या हस्ते न देता मनाचा मोठेपणा दाखवत गावातील ज्येष्ठ नागरिक,बांधकाम कामगार, महिला कामगार यांना बरोबर घेऊन त्यांच्या हस्ते शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले.शालेय साहित्य मिळाल्यानंतर या शाळेतील बाल गोपाळांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद यावेळी पाहायला मिळाला.

 

          शाळेतील सर्व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच अमोल गायकवाड यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाची इतर तरुणांनी ही प्रेरणा घेऊन सत्कार्य करावे असे आवाहन केले आहे .या वेळी अमोल गायकवाड यांनी सांगितले की वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या भेटवस्तूने अनेक बाल गोपाळांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद निर्माण करण्यातच खरा आनंद आहे व वाढदिवस साजरा झाल्याचे सौख्य आहे.

 

         या कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक,माता भगिनी, बांधकाम कामगार,तरुण वर्ग तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.