कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख कृष्णात पोवार यांनी अनेक सहकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन,पालकांच्या संमतीशिवाय विवाह नोंदणी न करण्याची मागणी .
सध्या महाराष्ट्रात मुलींना पळवून नेण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे .यामध्ये प्रामुख्याने लव जिहाद सारखे अनेक प्रकार समोर आल्याचे आपण पाहिले आहे .मुलींना फसवून पळून नेऊन लग्न करून मॅरेज सर्टिफिकेट मिळवले जाते व अशा विवाहितांना कायद्याचे संरक्षण मिळते . त्यानंतर अशा मुलींचे पुढे काय होते हे आपण प्रसारमाध्यमांवर अनेकवेळा पाहिले आहे. हा सर्व प्रकार लक्षात घेता मुलींच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे .
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालेला लव्ह जिहाद किंवा प्रेम विवाह सारखे प्रकार थांबावे यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख कृष्णात पोवार यांनी अनेक सहकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अमोल हेगडे यांना निवेदन दिले आहे .
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की लव्ह जिहाद हा प्रकार लँड जिहाद,वोट जिहाद, टारगेट किलिंग यासारखे मनसुबे समोर ठेवून सुरू आहे .कायद्याने अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर सज्ञान असल्यामुळे मुलांचे पालक किंवा आई वडील हतबल होतात व त्याचे गंभीर परिणाम मुलींना भोगावे लागतात .पालकांनी आपल्या मुलीचे चांगले शिक्षण होऊन तिचे कल्याण व्हावे व तिच्या विवाह प्रसंगी जमवलेली पुंजी खर्च करून तिचे चांगली व्हावे हाच एकमेव उद्देश असतो .
सध्या समाजात सोकावलेला हा सर्व प्रकार थांबवा यासाठी गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यांनी विवाह संदर्भात केलेला कायदा महाराष्ट्रातही लागू करावा .लग्नासाठी मुलाचे वय कायद्यानुसार 21 वर्षे असून मुलीचेही वय 21 वर्षेच करावे जेणेकरून चांगले निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये येईल व होणाऱ्या दुराचारापासून त्यांचे संरक्षण होईल असेही या निवेदनात म्हटले आहे .
यावेळी निवेदन देण्यासाठी उपसरपंच अमर उरुणकर,ग्रामपंचायत सदस्य गीता चौगुले, शारदा पोवार,राणी पाटील,भानुदास पाटील,विश्वास पाटील ,पांडुरंग हुजरे ,शिवाजी पाटील,विनोद पाटील, जालिंदर पाटील, भगवान मोरे, बाजीराव पाटील, बाबासो पाटील, अमर शिंदे, बीजी पाटील, भगवान, मोरे,, तानाजी चौगुले, संदीप चौगुले,, सरदार खाडे, सौरभ पोवार, नाथाजी पाटील, राजू उरुणकर, शिवाजी साळुंखे,विविध संस्थेतील पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते .