"मनमाड या ठिकाणी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडून जळीतग्रस्त कुटुंबीयांना मदत. "
मनमाड ( प्रतिनिधी ) :- ही दिवसांपूर्वी नगरचौकी तांडा मनमाड येथील गौतम जाधव यांच्या घराला आग लागल्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. कुटुंबावर मोठे संकट ओढवले, सदर परिस्थिती आमदार सुहास आण्णा कांदे यांना समजताच तात्काळ कुटुंबीयांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आज फरहान दादा खान यांनी पदाधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली, विचारपूस केली. या वेळी त्यांना सर्व संसार उपयोगी वस्तू यात भांडे धान्य या कुटुंबीयाला भेट दिली.
या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, उपजिल्हा प्रमुख सुनिल हांडगे,शहरप्रमुख मयूर बोरसे, आझाद पठाण,पिंटू वाघ, सुभाष माळवतकर, शशिकांत सोनवणे, दादा घुगे,राजू वाघ, बाबा पठाण, आसिफ शेख, कुणाल विसापुरकर उपस्थित होते.