मुंबई मंत्रालयात गोवंश संरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक; शासनाकडून तातडीने निर्णय
मुंबई मंत्रालयात गोवंश संरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक; शासनाकडून तातडीने निर्णय
मुंबई | प्रतिनिधी - प्रसाद घोगरे - 9370328944.
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात गोवंश संरक्षण, अनधिकृत कत्तलखाने आणि गोवंशाच्या बेकायदेशीर वाहतुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य मनीष वर्मा, संतनकुमार वर्मा, संजय भोसले, तसेच विश्व हिंदू परिषदेचे चे उत्तम कुदळे व शंकर गायकर, बजरंग दलाचे विवेक कुलकर्णी, प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीचे न्यायमूर्ती कमलकिशोर तातेड, अशोक जैन, पूनित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशिष जाधावर तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे (CMO) OSD कैलास अंडील उपस्थित होते.
महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या, अनधिकृत कत्तलखाने आणि गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शासनाकडून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपस्थितांनी दिली. गोवंश संरक्षणासाठी शासनाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले असून, राज्यभरात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
गोवंश संरक्षण आणि प्राणी कल्याणाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.








