श्रमिक मुक्ती दलाचा आंदोलनाचा इशारा. जिल्हा अध्यक्ष सुनिल गुलदगड. अहमदनगर जिल्हा.
ता.राहुरी:- *म्हैसगाव आग्रेवाडीच्या महिला पाण्यासाठी फिरतात वणवण.* आग्रेवाडीत पाण्याचा प्रश्न हा बिकट झाला आहे. गेली अनेक दिवसांपासून आग्रेवाडी येथिल जनता दुषित आणि शारयुक्त पाणी पेत आहेत,पण ग्रामपंचायत याकडे जाणुन बुजुन दूर्लक्ष करत आहे. ग्रामपंचयत बोअरवेल मोटर सुरू तर आहे, पण पाणी काही केल्याने टाकीत येत नाही. त्या मागच्या कारणाचा शोध घेतला असता. असे लक्षात आले की मेन लाईनलाच लोकांनी जगो जागी होल पाडून पाणी अडवून ठेवले आहे. त्यामुळें पाणी पाणीटाकी पर्यंत येण्याचा प्रश्नच सोडा. हि पाणी गळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही लोक आपले पाणी भरून हे पाणी चालुच ठेवतात. यावर ग्रामपंचायत म्हैसगाव येथे अनेक अर्ज विंनत्या केल्या परंतु गेंड्याच्या कातडीच्या सताधाऱ्याना आजुन वेळ भेटलाच नाही. आमच्याकडे पैसाच शिलक नाही. असे कारण दाखवत नागरिकांची हेळसांड सुरूच आहे. आग्रेवाडीच्या या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कधी सुठणार? आग्रेवाडीच्या नागरिकांना दूषित शारयुक्त पाणी आजुन किती दिवस प्यावे लागणार? बेजाबदारपणामुळे पाइपलाइन होल पाडणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार का? भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सत्ताधाऱ्यांना जाग कधी येणार? अशा अनेक चर्चा म्हैसगाव आग्रेवाडी परीसरात सुरू आहे