खेडले परमानंद येथे शेळ्या चोरीचे सत्र सुरू. गेल्या वर्षापासून किमान 30 शेळ्या चोरीस गेल्या..
प्रतिनिधी:- खेडले परमानंद नेवासा
गुरुवारी रात्री दोन ते तीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खेडले परमानंद वळण रस्त्या लगत असलेल्या इनामदार वस्ती वरून चार शेळ्या चोरून नेल्या.
इनामदार बादशाह भाई, व इनामदार मुस्ताक भा
या दोन सख्ख्या भावाच्या शेळ्या चोरीस गेलेल्या आहेत. यापूर्वीही एक महिन्यापूर्वी खेडले परमानंद शिवारा
योगेश बनकर, खंडू बनकर, कासम शेख यांच्या शेळ्या चोरीस गेल्याचा प्रकार झालेला आहे
सदर गुन्हेगार हा परिसरातील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शुक्रवारी घोडेगाव बाजार च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री हा प्रकार घडून येत असल्याचे दिसून येत आहे. या शेतकऱ्यांनी त्यानंतर घोडेगाव बाजारात जाऊन चौकशी केली पूर्ण बाजार तपासून बघितला. परंतु त्यांना बाजारात त्यांच्या आढळल्या नाही
तरी या चोरीच्या सत्रा मधला मास्टर माईंड लवकरात लवकर पोलिसांनी जेरबंद करावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने होत आहे
शेतकऱ्यांना आवाहन करण्यांत येत आहे की चोरी झाल्याच्या नंतर रीतसर पोलीस फिर्याद नोंदवावी. जेणेकरून पोलीस प्रशासन तुमची गेलेली शेळी परत देणार नाही परंतु चोराचे मुस्के नक्कीच आवळतील....