दरोड्याच्या तयारीतील आरोपींना पकडत असताना घडला थरार, स.पो.नि.निरज बोकिल यांच्यावर प्राणघातक हल्ला.
राहुरी तालुक्यातील मल्हार वाडी रोडवर शनिवार दिनांक ४ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपी मयूर राजू ढगे व ईश्वर अशोक मोरे राहणार नाशिक यांना राहुरी पोलिसांनी पाठलाग करून पकडले असून याच दरोड्याच्या प्लॅनमध्ये सहभागी असलेले आरोपी रणजित केशव कांबळे, अजय पवार, राहुल मोरे हे पोलिसांना चकमा देऊन पसार झाले. हे सर्व आरोपी निफाड जिल्हा नाशिक येथील आहे.
या धर -पकड सत्रा दरम्यान पोलीस सब इन्स्पेक्टर निरज बोकील यांच्यावर आरोपी मयूर ढगे यांनी सतुर ने प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून मयूर ढगे याच्यावर नाशिक शहर पोलीस स्टेशनला दहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अशी माहिती राहुरी पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे.
तर याच गुन्ह्यातील आरोपी रमेश वाकडे राहणार अहिल्यादेवी नगर निफाड व रणजित केशव कांबळे राहणार कुंदे गल्ली निफाड यांना शिर्डी या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आलेले आहे.ज्या धडाकेबाज कारवाईने राहुरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे .