नेवासा पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत शहीद बंडू नवथर यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.

प्रतिनिधी :-संभाजी शिंदे खेडले परमानंद

जवान बंडू बन्सी नवथर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

 

:गडचिरोली येथे तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानाने अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना गडचिरोली येथे घडली आहे. यामध्ये जवान बंडू बन्सी नवथर हे शहीद झाले आहे.

 

 जवानावर गोळी झाडल्यानंतर या जवानाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान नवथर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथे आणण्यात आले .

 

 

त्यावेळी सैन्यदल व गावकर्‍यांकडुन त्यांची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामुळे संपूर्ण गावात शोककळा होते. यावेळी सैन्य दलाकडून तीन वेळेस हवेत गोळीबार करून मानवंदना देण्यात आली या अंत्यविधीसाठी राजकीय सामाजिक शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सकाळी दहा वाजता अंत्यविधी करण्यात आला .या अंत्यविधीसाठी गावातील व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहीद नवथर यांच्या मागे आई वडील पत्नी मुलगा मुलगी तीन चुलते असा मोठा परिवार होता.

 

अंत्यविधीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे ,पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे ,बाबा आरगडे,संजय चव्हाण

,अशोक चौधरी,सर्जेराव घाणमोडे,मोहन गहाळ,आव्हाड मेजर ,देविदास भेंडेकर,दरंदले मेजर संतोष घुले ,मेजर अंजन च्वहाण,दादा शिंदे , नागे मेजर

रमेश नवथर,ठोंबळ मेजर,नवथर मेजर ,पाचुडे मेजर,विष्णु घुले आदी यावेळी उपस्थित होते.