गुणवंत विद्यार्थ्यांमुळे सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या नावलौकिकात भर,घवघवीचे यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा उत्साहात संपन्न .

गुणवंत विद्यार्थ्यांमुळे सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या नावलौकिकात भर,घवघवीचे यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा उत्साहात संपन्न .

गुणवंत विद्यार्थ्यांमुळे सावित्रीबाई फुले विद्यालयाची नावलौकिकात भर

 

            राहुरी तालुक्यातील नावलौकिक असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता दहावी व बारावी मध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला .या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महानंद माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

             विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमुळे शाळेच्या नावलौकिकात सतत भर पडते .तालुक्यात प्रथम, द्वितीय , तृतीय क्रमांकाने यश मिळवणारे विद्यार्थी विद्यालयाचे असल्याने शाळेच्या गुणवत्तेचा आलेख वाढत आहे.याबद्दल सचिव डॉ. महानंद माने यांनी विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापक यांचे कौतुक केले व गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करावे व यश मिळवण्यासाठी वापरलेले अभ्यासाचे तंत्र सांगावे असे प्रतिपादन केले .उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . कु. दिविका कुलकर्णी व कु पूर्वा काळे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या

 

        विद्यालयातील 10 वी व 12 वी च्या एकण 272 विद्यार्थ्यांपैकी 265 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल हा 97.42% लागला आहे यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 21 असून 75% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 81 असल्याने विद्यालयाच्या नावलौकिकात विशेष भर पडली आहे .

 

             आपले अध्यक्षीय भाषणात डॉ . महानंद माने यांनी घवघवीत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले असून या विद्यार्थ्यांच्या यशासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षकांना शाबासकी देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे .यापुढेही विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी विद्यालयासाठी व शिक्षकांसाठी जी काही मदत लागेल ते करण्याचे आश्वासन डॉ महानंद माने यांनी दिली आहे . मागील वर्षापासून विद्यालयातील 12 वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी Cet चे क्लासेस सुरु केल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळत आहेत.

              या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे यांनी केले.सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका मोनिका म्हसे,प्रियंका पवार यांनी केले तर आभार विद्यालयाचे उपमुख्यध्यापक बाळासाहेब डोंगरे यांनी केले आहे . या प्रसंगी कृषी विद्यापीठातील जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे शेषराव देशमुख प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री उपस्थित होते.

            कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक मनोज बावा, प्रा जितेंद्र मेटकर ,घनश्याम सानप ,संतोष जाधव , रवि हरिश्चंद्र ,सचिन सिन्नरकर , संगिता नलगे ,रवींद्र हिवाळे , सविता गव्हाणे, अनघा सासवडकर यांनी परिश्रम घेतले .या कार्यक्रमाकरिता विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.