बार्शी तालुक्यातील गौडगावचे वीर सुपुत्र जवान रामेश्वर काकडे यांना वीरमरण
बि पि एस राष्ट्रीय न्यूज सोलापुर
जिल्हा प्रतिनिधी सम्मेद तरटे
दि.16-02-2022 रोजी महाराष्ट्राचे वीर सुपुत्र आणि वीर जवान रामेश्वर वैजनाथ काकडे वय(30) गौडगाव तालुका बार्शी यांना देशाचे रक्षण करत असताना गोळी लागल्याने वीर मरण आले.
वीर जवान शहीद झाल्याची वार्ता कळताच काकडे कुटुंबियांवर व गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. वीर जवान रामेश्वर काकडे हे 2012 मध्ये बी एस एफ मध्ये जॉईन झाले होते. त्यांनी जम्मू-काश्मीर, उत्तराखंड अशा ठिकाणी देशसेवा केली आहे.
आई-वडिलांचे एकुलते एक सुपुत्र असल्याकारणाने त्यांच्या घरावरचे छत्र हरपले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व तीन महिन्या चे बाळ, दोन बहिणी असा परिवार आहे.
रामेश्वर काकडे एका महिन्यापूर्वी गावाकड सुट्टीसाठी आलेले होते त्यांची ही शेवटची भेट ठरली. वीर जवान रामेश्वर काकडे यांचे पार्थिव शरीर छत्तीसगड येथून पुणे येथे दि.17 रात्री नऊच्या उशिरापर्यंत येण्याचा अंदाज आहे. तेथून शासकीय वाहनाने त्यांना त्यांच्या गावी गौडगाव येथे आणण्यात येईल व तिथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे चुलत बंधू विनोद काकडे यांनी सांगितले.