शेवगाव शहरासह तालुक्यातील रस्त्याची अवस्था खड्ड्यामुळे बिकट झाली असून हे खड्डे तातडीने हे खड्डे दोन दिवसात बुजवा अन्यथा तहसील कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय समोर खड्डे खांदु असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिला आहे.
शेवगाव-(प्रतिनीधी)-यशवंत पाटेकर
शेवगाव शहरासह तालुक्यातील रस्त्याची अवस्था खड्डया मुळे बिकट झाली असून हे खड्डे तातडीने दोन दिवसात बुजवा अन्यथा तहसील कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर खड्डे खांदू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त कि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे व जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भागवत यांच्या नेतृत्वखाली शेवगावचे तहसिलदार छगन वाघ यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा ईशारा दिला आहे.निवेदनात म्हटले आहे कि, शेवगाव शहरासह तालुक्यातून विविध राज्य मार्ग जातात तसेच प्रमुख जिल्हा मार्ग व ईतर मार्ग हि आहेत या सर्व मार्गांची परिस्थिती अंत्यत दयनीय झालेली आहे. या सर्व मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग शेवगाव यांच्याकडे पाठपुरावा करून देखील यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही संबंधित विभागाने केलेली नाही.संबंधित विभागाच्या कार्यालयात कुठलाही जबाबदार अधिकारी आपणास आढळून येणार नाही. मुख्यालयाच्या ठिकाणी निवास करणे आवश्यक असतानाही या कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तालुक्याबाहेर वास्तव्यास आहेत. यामुळे नेमकी दाद कुणाकडे मागायची हाच प्रश्न आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची बिकट परिस्थिती झाल्याने अनेक छोटे-मोठे अपघात ही घडत आहेत.अनेक नागरिकांना या खड्डयांच्या रस्त्यामुळे विविध व्याधींना सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग डांबरी रस्त्यावरील खड्डे चक्क मुरूम टाकून बुजवतात हि चक्क नागरिकांच्या व शासनाच्या डोळ्यात धुळफेकच आहे तरी या सर्व प्रकाराची दखल घेत प्रामुख्याने शेवगाव -पैठण, शेवगाव -गेवराई ,शेवगाव- तिसगांव, शेवगाव-मिरी,शेवगाव - ताजनापूर या रस्त्यांवर तर चालणंही मुश्किल आहे यातील शेवगाव -मिरी रस्त्यांवर तर ढोरजळगांव ते निंबेनांदूर हा डांबरी रस्ता चक्क मुरूम टाकून करण्यात आला आहे या कामाची तातडीने चौकशी करून जनतेची होणारी कुचंबणा आपण थांबवावी हि मागणी पक्षाच्या वतीने करून येत्या दोन दिवसात खड्डे बुजविले नाही तर तहसील कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर खड्डे खांदू व या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहील असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, उपतालुकाध्यक्ष संजय वणवे,रामेश्वर बलिया,देविदास हुशार, दिलीप सुपारे, ज्ञानेश्वर कुसळकर, योगेश गरड, अजिनाथ वेताळ, साईनाथ धावणे, अप्पासाहेब आर्ले, साईनाथ बलिया,अमोल धावणे,अमिन सय्यद दिपक बलिया,बाळा वाघ, निवृत्ती आधाट,विठ्ठल दुधाळ,सुरज गोरे, राम बलिया,गणेश डोमकावळे, सुनिल काथवटे,मंगेश लोंढे, संदीप देशमुख यांच्या सह पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.