पत्रकारांच्या विचार व मार्गदर्शनाने समाज चालतो.

पत्रकारांच्या विचार व मार्गदर्शनाने समाज चालतो.

पत्रकारांच्या विचारांवर समाज चालतो --

सुनीता ताई गडाख

हजारो पत्रकारांनी समाजहित समोर ठेवून केलेल्या लिखाणा मुळे भारतात लोकशाही रुजवण्याचे काम केले त्यामुळेच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे .पत्रकाराच्या विचारांवर हा समाज चालतो तसेच राजकारणी देखील वृत्तपत्रात आलेले अग्रलेख बातम्या याचे वाचन करुन ध्येय धोरण ठरवतात व त्या दिशेने काम करत असतो  व आपली दिशा ठरवत असतो  मात्र पत्रकार हा विचारांचा भक्कम लागतो, पत्रकारांच्या विचारात एक दिशा पाहिजे, आपण बातमी करताना पत्रकार मंडळींनी शंभर वेळा विचार केला पाहिजे यामध्ये सामजिक हेतू जोपासने महत्वाचं आहे कारण समाजाला चांगले विचार देण्याच काम केल्याने पत्रकारांमुळे जगात सामाजिक व राजकीय बदल होतात असे प्रतिपादन पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता ताई गडाख यांनी केले 

 

त्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नेवासा तालुका यांच्या वतीने आयोजित केलेल्या ओळखपत्र वाटप कार्यक्रमात बोलत होत्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान चे हं.भ.प.शिवाजी महाराज देशमुख हे होते तर ओळखपत्र वाटप मा. सभापती सुनीता ताई गडाख यांच्या हस्ते करण्यात आले माजी नगराध्यक्ष सतिष पिंपळे जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण नानासाहेब पवार अरुण सोनकर रमेश शिंदे, व कैलास जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

 

स्वागत संतोष सोनवणे केले प्रस्तावित पत्रकार अशोक तुवर यांनी केले 

यावेळी बोलताना माननीय सुनीता ताई गडाख  म्हणाल्या की आम्ही संपादकीय वाचूनचं  घडामोडी चा अभ्यास करतो. राजकिय वेक्तीच्या स्टेप बदलताना पत्रकारच्या चं विचारावंर बदलते हे नक्की.

आज महाराष्ट्र राज्यातील एवढ्या मोठ्या पत्रकार संघाचे कार्य नेवासा तालुक्यात उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे याचा मनस्वी आनंद होत आहे.

तालुक्यात छत्री वाटप , शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप , पत्रकार दिन, पत्रकारांचा स्नेह मेळावा असे छान उपक्रम राबविले जातात आज महाराष्ट्र राज्य मराठी संघाचे ओळखपत्र वाटप करतांना अभिमान वाटतो . 

यावेळी अध्यक्षस्थाना वरून बोलताना  देशमुख महाराज म्हणाले की  पत्रकारितेला सुरवात येथूनच झाली आहे .समाजाला दिशा देण्याचे कामं माऊलींनी ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथातून दिली आहे तालुक्यातील तालुक्यातील सर्वच पत्रकार संघाचे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान ला नेहमीच सहकार्याची भूमिका असते आज हा सूंदर असा ओळखपत्र वाटप कार्यक्रम माऊलीच्या दारात झाला पुढे देखील असे कार्यक्रम इथेच व्हावे व आपल्या लेखणीतून माऊलीचे कार्य जगा पुढे यावे. 

यावेळी तालुका अध्यक्ष मोहन गायकवाड , अशोक तुवर, मकरंद देशपांडे, राम शिंदे, गणेश दराकुंडे , राहुल चिंधे अभिषेक गाडेकर , सौरभ मुनोत, सोमनाथ कचरे, पवन गरुड , विठ्ठल उदावंत, आदेश जावळे ,सतिष उदावंत,  रमेश पाडळे, मंगेश निकम, काका नरवणे ,  संतोष सोनवणे, सचिन कुरुंद, अमोल मांडणं , ऋषभ तलवार, मयूर वाखुरे, विकास बोर्डे,  सचिन कडू, दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब पंडित , संभाजी शिंदे, युनूस पठाण, बाळासाहेब पिसाळ, अविनाश जाधव,राजेंद्र कडू, रविंद्र लिंबोरे असे मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते 

यावेळी कार्यकामचे सूत्रसंचालन पत्रकार मकरंद देशपांडे यांनी केले तर आभार मयूर वाखुरे यांनी मानले .

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे कार्य सुरू आहे .

तालुक्यातील पत्रकार बांधवांचे ओळखपत्र वाटप कार्यक्रम पार पडला या पुढे देखील पत्रकाराच्या न्याय हक्का साठी सदैव तत्पर राहणारं व पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडणार तसेच भविष्यात पत्रकारांचे हित जोपासणार असे प्रतिपादन मोहन गायकवाड तालुका अध्यक्ष यांनी केले.