अल्पवयीन मुलीचा राहुरी पोलिसांकडून दोन तासात शोध पालकांच्या ताब्यात दिले

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे

अल्पवयीन मुलीचा केवळ 02 तासात शोध

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत मागील 22 महिन्यात शोध घेतलेल्या अल्पवयीन मुलींची संख्या -96

    राहुरी बु ता.राहुरी येथील अल्पवयीन मुलगी वय 17 वर्ष हिस दिनांक 25/11/2025 रोजी सायंकाळी ४:३० च्या सुमारास अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तींनी पळवून नेले बाबत राहुरी पेालीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 137(2) प्रमाणे दिनांक 25/11/2025 रोजी रात्री 08:00 वाजता फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मुलीचा व पळवुन घेवुन जाणारे आरोपीचा शोध घेणेकामी राहुरी पोलिस स्टेशन पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालु असताना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की अल्पवयीन मुलगी राहुरी रेल्वे स्टेशन आरडगाव रेल्वे चौकी जवळ रुळाच्या रेल्वे रुळाच्या बाजूला असलेबाबत

बातमी मिळाली होती.

सदर बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करून बातमीतील ठिकाणी जावुन अल्पवयीन मुलीचा शोध घेतला असता सदर अल्पवयीन मुलगी हि नैराश्यातून रेल्वे रुळाजवळून जात असताना स्थानिक लोकांना आणि पोलिसांना रात्री 10 चे सुमारास मिळून आल्याने राहुरी पोलीस तपास पथकांने ताब्यात घेतले आहे. सदर अल्पवयीन मुलीचा शोध 02 तासात घेऊन तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आली आहे. पुढील कायदेशीर प्रकिया याबाबत अधिक तपास चालु आह

                सदर कारवाई मा. सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार / तुळशीराम गीते, पोहेकॉ / संभाजी बडे, पोहेकॉ/संदिप ठाणगे, पोकॉ/ अंकुश भोसले , महिला पोकॉ /वंदना पवार, पोकॉ/संतोष शिंदे ,चालक पोलीस शिपाई जालिंदर साखरे यांनी केली आहे . सदर गुन्हयाचा तपास हेड कॉन्स्टेबल / संभाजी बडे हे करीत आहेत.

           राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या अल्पवयीन मुला-मुलींची आपण खुलेपणाने संवाद ठेवून अशा प्रकारे त्यांच्या मनात कुठलाही ताण तणाव किंवा आकर्षण निर्माण होऊन त्यांच्यावर अपहरणाचा प्रसंग येऊ नये यासाठी आपल्या पाल्यांसोबत मित्रत्वाने मोकळेपणाने वागून संवाद ठेवावा .तसेच अल्पवयीन पाल्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या व ते वापरत असलेल्या मोबाईल ॲप वर लक्ष ठेवावे .

      सदर गुन्ह्याबाबत तसेच इतर काही माहीती दयावयाची असल्यास श्री. पोनि, संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन संपर्क - 8483038953वर माहिती द्यावी

                

         ( संजय आर ठेंगे )

         पोलीस निरीक्षक

       पोलीस स्टेशन राहुरी .