*पोलीस पाटील दिनानिमित्त राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने राहुरी तालुक्यातील पोलीस पाटलांचा सन्मान*

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या कायदा व सुव्यवस्था प्रसंगी तालुक्यातील सर्वच पोलीस पाटलांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच नाउघड गुन्ह्यांमध्येही गुन्हे उघड किस आणण्यासाठी, गाव पातळीतील वाद वेळप्रसंगी मिटविण्यासाठी , मागील वर्षात झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी निष्पक्षपाती कामकाज करून दोन्ही निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी व ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलिसांनी शोधलेल्या 98 मुलींच्या शोधामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावल्याने राहुरी तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांचा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्य पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या हस्ते सर्टिफिकेट व गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमानंतर पोलीस पाटील संघटना राहुरी तालुका यांनी संघटनेच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून पोलीस व पोलीस पाटील यांच्यातील संबंध अधिक दृढ व वृद्धिंगत केले. 

सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलिस अधिकारी श्री जयदत्त भाऊसाहेब यांनी 1967 पासून पोलीस पाटील हे पद परीक्षा घेऊन भरले जात असल्याने निश्चितच पोलीस पाटील होण्यासाठी कस लागत असल्याबाबत सांगून पोलीस पाटील हा सिविल कपड्यातील पोलिसच असल्याने त्यांनी शंभर टक्के निष्पक्ष काम करावे असे आव्हान केले व सर्व पोलीस पाटलांना पोलीस पाटील दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी तालुक्यातील कमी झालेल्या मोटरसायकल चोरी चे प्रमाण, कमी झालेले मोटर चोरींचे प्रमाण, तसेच ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलिसांनी शोधलेल्या 98 मुलींच्या शोधामध्ये पोलीस पाटील यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे अधोरेखित करत सर्व पोलीस पाटलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ तुळशीदास गीते पोलीस हवालदार अशोक शिंदे आजिनाथ पाखरे व पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील उपाध्यक्ष हिराबाई सुधाकर नरोडे , सदाशिव पाराजी तागड,किरण गंगाधर उदावंत, संजीव शिंदे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली व सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब पवार पाटील खुरसडगाव पोलीस पाटील यांनी केले. संजीव शिंदे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रम उत्साहात आनंदी वातावरणात पार पडला तालुक्यातील सर्व पोलीस पाटील हजर होते.