रयत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत बालदिंडी उत्साहात साजरी

रयत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत बालदिंडी उत्साहात साजरी

श्रीरामपूर रयत शिक्षण संस्थेच्या  स्व.सी.एस.के सोमैया प्राथमिक विद्या मंदिर येथे आषाढी  एकादशी निमित्ताने बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विदयालयातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणी, वारकरी, संत यांच्या सुंदर वेशभूषा सादर केल्या  या प्रसंगी पालखीचे पुजन सी.डी.जे महाविदयालयाचे प्राचार्य मा. डॉ. सुहास निंबाळकर तसेच गुरुकुल पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष बकरे सर, श्री चोळके सर तसेच विदयालयाचे मुख्याध्यापक मा. एस. एम. दवडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. गुरुदत भजनी मंडळ यांच्या  भजनाने शालेय वातावरण भक्तिमय झाले व विद‌यार्थ्यांनी देखील भजनाच्या तालावर ठेका धरला. विद्यालयाचा सर्व परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमला. बालदिंडीचे औचित्य साधून ग्रंथदिंडी कलरा, व समाज प्रबोधनपर घोषवाक्ये व सजविलेल्या पालख्यांनी तसेच विठ्ठल- रुख्मिनि  व वारकरी वेशातील बालदिंडीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. बालदिंडी सोहळ्यात बहुसंख्या पालकवर्ग सहभागी झाले होते. सदर बालदिंडी रयत शिक्षण संन्स्थेच्या मॅनेजिंग कौंसिल सदस्या, मीनाताई जगयने यांच्या मार्गदर्शनाखाली व विदयालयाचे मुख्याध्यापक एस.एम.दवडे यांचे नियोजनाखाली तर विभाग प्रमुख सौ. बनकर आर.एस यांच्या सहकार्याने पार पडली. सदर कार्यक्रम यशस्वी होणासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. .! 

(प्रतिनिधी दिपक कदम. बीपीएस न्यूज श्रीरामपूर)