श्रद्धा, परंपरा ,भक्तीचे प्रतीक म्हणजे बेलपिंपळगावच्या रोकडे हनुमंताचा यात्रा उत्सव..

श्रद्धा, परंपरा ,भक्तीचे प्रतीक म्हणजे बेलपिंपळगावच्या रोकडे हनुमंताचा यात्रा उत्सव..

प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा

श्रद्धा, परंपरा ,भक्तीचे प्रतीक म्हणजे बेलपिंपळगावच्या रोकडे हनुमंताचा यात्रा उत्सव..

 

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव हे रोकडोबा हनुमानाच्या नावाने नवलौकिक म्हणून ओळखले जाणारे गाव असुन या ठिकाणी रोकडोबा हनुमंत रायाची यात्रा भव्यदिव्य स्वरूपामध्ये भरवली जाते या यात्रा उत्सव प्रारंभ नंतर आज दुसऱ्या दिवशी भव्य मिरवणूक गावा मधून ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आली होती .

 

  यात्रा उत्सवामध्ये हनुमंत रायाचे अभिषेकासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर, गोदावरी, या ठिकाणाहून गावातील युवक मंडळी तसेच ग्रामस्थ कावड घेऊन पाणी आणतात तसेच हनुमंत रायाचा त्या पाण्याने अभिषेक केला गेला तसेच लाखो भाविकांनी मनोभावी दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी केली होती तसेच दर्शनासाठी गावकऱ्यांच्या वतीने व देवस्थानच्या ट्रस्ट अध्यक्ष सदस्य यांच्यावतीने दर्शन बारीची व्यवस्था केली गली होती.

 

तसेच जिल्हाभरातून नेतेमंडळी असतील तसेच सामाजिक कार्यकर्ते असतील या सर्वांनी रोकडोबा हनुमानंत तयाचे मनोभावे दर्शन घेतले याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पत्नी आशाताई मुरकुटे, माजी आमदार शंकराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, यांनी दर्शना साठी आपली हजेरी लावली.

 

या यात्रा उत्सवाचे महत्त्व म्हणजे या हनुमंतरायाला बोललेला नवस पूर्ण होतोच अशी याची परंपरा असल्याचे येथील विश्वस्तांनी बोलताना सांगितले. तसेच या ठिकाणी दीपोत्सव श्रावण महिन्याच्या कालखंडामध्ये महिनाभर करण्यात आला त्यामध्ये अनेक नेते मंडळींनी या दीपोत्सवामध्ये आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून दीपोत्सवालाही हजेरी लावली.

 

यावेळी बेलपिंपळगाव गावामध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची ओड पहावयास मिळत होती.

 

 या यात्रेमध्ये यात्रेची शोभा वाढवण्यासाठी पाळणे, लहान मुलांचे खेळणीच दुकाने, सौंदर्य प्रसादानाचे दुकाने, खाऊचे दुकाने, तसेच आदी दुकानांचा यात्रा उत्साह मध्ये हा मोठा सहभाग नोंदवला गेला. 

 

या यात्रा उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे बोललेल्या नववासाची पूर्तता करण्यासाठी शेरनीचे वाटप भक्तांच्या वतीने करण्यात आली मोठ्या प्रमाणात गाव गावातील तसेच जिल्हाभरातील भावी भक्त बेलपिंपळगाव येथे आपल्या बोललेल्या नवसाची पूर्तता झाल्यानंतर शेरनी वाटप केली गेली.

 

तसेच तरुणाईंनी ढोल ताशाच्या गजरामध्ये गावभरातून मोठी मिरवणूक व गुलालाची उधळण करत प्रभू रामचंद्र भगवान की जय बजरंग बली की जय या नामाच्या जय घोषामध्ये मारुतरायाची गावातून मिरवणूक काढली या मिरवणूक मध्ये युवक ,आबाल वृद्ध ,गावकरी मंडळींनी मोठा सहभाग नोंदवला होता. हा दोन दिवशी यात्रा उत्सव मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला.

 

यावेळी अध्यक्ष विजय शिंदे, राहुल शिंदे,बाळासाहेब तराळ, संतोष माळवे, बाबासाहेब शिंदे संजय शिंदे गणेश पुंड प्रकाश शेरकर ज्ञानेश्वर गटकळ दत्तात्रय कांगुणे ,आप्पासाहेब शिंदे, बबन शिंदे ,रोहिदास सुरसे दत्तात्रेय माळवे ,चांगदेव माने, दत्तात्रय सिताराम शिंदे, सार्थक धनवटे दत्तात्रय कांगुणे, राजेंद्र शिंदे,