वांबोरी पाईप चारी पंप गृह येथे अनेक दिवसांपासून अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष नाही

वांबोरी पाईप  चारी पंप गृह येथे अनेक दिवसांपासून अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष नाही
वांबोरी पाईप  चारी पंप गृह येथे अनेक दिवसांपासून अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष नाही

राहुरी तालुका प्रतिनिधी -  डॉ देवेंद्र शिंदे

वांबोरी पाईप चारी पंप गृह येथे अनेक दिवसापासून अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. घडत आहेत गैरप्रकार.पंप गृहात कर्मचारी कागदोपत्री जास्त आहेत आणि प्रत्यक्षात कमी आहेत.विशेष म्हणजे या विभागात कोणत्याही प्रकारचे हजेरी रजिस्टर.व डेडस्टॉक रजिस्टर देखील नाही आणि. कोणत्याही प्रकारचे सिसिटीव्ही कॅमेरा नसल्याचे आढळले आहेत.

मुळा धरणावरच्या वांबोरी चारी पंपगृहातील बॅटऱ्या इलेक्ट्रीक / पंपगृहाच्या कामाचे मटेरियल भंगार समजून सामानाची स्व:त च्या फायद्याकरीता मोठया प्रमाणात विल्हेवाट लावलेचा प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे व संबंधित ठेकेदाराने त्या वस्तु विकल्याचे देखील सांगितले आहे. सदर खराब झालेल्या वस्तुचा शासकीय पद्धतीने लिलाव करणे गरजेचे असते परंतु या विभागतील ठेकेदाराणे अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्या वस्तु भंगार वाल्याला विकल्याचे वरवंडी सरपंच श्री भाऊसाहेब कोळेकर यांच्या निदर्शनास आले आहे या कारभारास जवाबदार अधिकारी वांबोरी चारीचे शाखा अभियंता अमोल सातपूते , इलेक्ट्रीक ठेकेदार योगेश गरड ,व वांबोरी ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब भगीनाथ लोंढे हे वांबोरी सबस्टेशन ,बुऱ्हानगर पा वांबोरी पाईप  चारी पंप गृह येथे अनेक दिवसांपासून अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष नाही णीयोजना , सोनई पाणी योजना असा हा एक कर्मचारी पाच ठिकाणचा कारभार वेगवेगळ्या मानधनावर करत आहे वरवंडी सरपंच हे हा सर्व प्रकार उघडकिस आणण्याकरीता जिल्हाधिकारी / व जिल्हापरिषद आहिन्यानगर यांचेकडे सर्व पुरावे सादर करून यावर कायदेशिर कार्यवाही करावी कार्यवाही न झाल्यास अमरण उपोषणा सारखा मार्ग अवलंबनार आहे.