बिल्ववनात धुराडया निमीत्त तरुणाईत जल्लोषाचे उधाण ..... !!!
श्रीरामपूर तालूक्यातील बेलापूर खु येथील हरिहर केशव गोविंद बनात धुराड्याच्या डफावरील कवण ( जुनी पूराण, रामायण ,महाभारतावर आधारीत ४ ओळीचे गीत ) आणी डफाच्या ठेक्यावरील लयबध्द नृत्य याला अनेक शतकांची परंपरा आहे .आधुनिकतेची कास धरलेल्या आपल्या सध्याच्या पिढीने याकडे दूर्लक्ष केल्यामूळे १०ते १५ वर्षांपूर्वी बनामधे डफाच्या ठेक्यावर ४- २ जेष्ठ वयोवृद्ध सोडले तर कुणीही हजेरी लावत नसत . सुमारे ३० वर्षांपूर्वी याच बना मधे यात्रेत उभे रहायला जागा पूरत नसे . डफाच्या ठेक्यावर बेधुंद होऊन नाचणाऱ्यांवर उपस्थीत महीला पूरुष रेवड्यांची उधळण करत व त्या उधळलेल्या रेवडया प्रसाद म्हणून खाण्यात अबालवृद्ध धन्य मानत. परंतु हळू हळू TV ने व सुशीक्षीत पणाचा आव आणण्यात व्यस्त आपण, या जून्या परंपरेकडे दूर्लक्ष केल्याने हि परंपरा बंद पडली .
परंतु या संपलेल्या परंपरेचे पूर्न जीवन करण्याचा चंग येथील काही युवकांनी १० वर्षांपूर्वी बांधला व शिमग्यापूर्वी महिनाभर जुन्या जाणत्या जेष्ठांना बरोबर घेत त्यांच्या मार्गदर्शनात सराव करत नाचण्याच्या वेग वेगळया चाली शिकत याचे पूर्न जीवन केले व सुमारे २०-२५ जणांचा संघ करून धूलिवंदनाला हि परंपरा जोपासली . यामधे हरिहर केशव गोविंद देवस्थाननेही प्रोत्साहन व सहाय्य दिले . छोटया मूलांना यामधे सहभागी करुन गेल्या वर्षी सुमारे ४० तरुणांनी या पारंपारीक नृत्याचा आनंद घेतला .
या वर्षी आणखी एक पाउल पूढे टाकत महिलांना एक महिनाभर या नृत्याचे प्रशिक्षण देत, धुलिवंदनाच्या दिवशी ३५ महिला व मुली आणी सुमारे ४० पूरुष व मुले या पारंपरिक सोहळयात थिरकले . महिला व मुलींनी नऊवारी साडी नेसत व मुलांनी पांढरेशुभ्र कूर्ता पायजमा व गांधी टोपी घालून या नृत्यात सहभाग घेतला . त्यामुळे हा सोहळा अनुभवण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थीत होता . पून्हा जूने दिवस आल्याचा अनुभव अनेकांच्या तोंडून निघत होता व या तरुणाईच्या प्रयत्नाना भरभरून दाद सर्वच स्तरातील महिला व पूरुषांकडून मिळत होती .ड फाच्या ठेक्यावर मनमुराद नाचणाऱ्या युवक युवतींना पाहून सर्वांचे पायही अपोआप हालत होते व त्यांच्या प्रयत्नांना तारीफ ही होत होती .एकंदर सर्वच चित्र बघून तरुण पिढी योग्य मार्गावर आहे असेच म्हणावे लागेल .