हर्ष फाउंडेशनने ठेवला आहे समाजापुढे एक आदर्श.

हर्ष फाउंडेशनने ठेवला आहे समाजापुढे एक आदर्श.
हर्ष फाउंडेशनने ठेवला आहे समाजापुढे एक आदर्श.

'हर्ष फाउंडेशन'चे समाजामध्ये निर्माण केला एक वेगळा आदर्श 

एका वर्षात फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना उपलब्ध करून देण्यात आल्या मोफत १०० रक्त पिशव्या 

पुणे : प्रतिनिधी 

अप्पासाहेब घोरपडे यांनी एक वर्षापूर्वी 'हर्ष फाउंडेशन'चे एक छोटेसे रोपटे लावले होते. अल्पावधीतच म्हणजे एका वर्षात या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. एका वर्षामध्ये फाउंडेशनच्या वतीने समाजातील गरजू, गोरगरीब व्यक्तींना मोफत शंभर रक्त पिशव्या उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या मोलाच्या सामाजिक योगदानाबद्दल 'हर्ष फाउंडेशन'ला महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील अनेक स्वंयसेवी संस्थानकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे.

समाजाच काहीतरी देणं लागत या उदात्त हेतूने अप्पासाहेब घोरपडे यांनी एक वर्षापूर्वी 'हर्ष फाउंडेश'ची स्थापना केली. हर्ष फाउंडेशन चे काम हे पूर्ण व्हाट्सअप ग्रुपच्या आधारे चालत. फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक सेवेचा वसा घेतला. अनेकवेळा गरजू, गरिब रुग्णांना रक्त न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला. समाजातील गोरगरिबांना रक्ताअभावी जीव गमवावा लागू नये या भावनेने फाउंडेशनच्या माध्यमातून रक्त संकलन करून पुरवठा करण्याचा संकल्प केला. एक वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल्या 'हर्ष फाउंडेशन'च्या माध्यमातून गरजूंना १०० पिशव्या उपलब्ध करून दिल्या आहेत. आतापर्यंत सातारा सांगली कोल्हापूर पुणे मुंबई कल्याण नगर या ठिकाणी बॅग देण्यात आलेले आहेत. शौर्यपीठ तुळापुर येथील सोमनाथ सिंपी यांना 100 वी रक्ताची पिशवी उपलब्ध करून देत एका वर्षात शतकवीर होण्याचा बहुमान मिळवला आहे. समाजामध्ये व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून रक्तदानाबाबत जनजागृती करून गरजूंना व गोरगरीब व्यक्तींना मोफत रक्त उपलब्ध उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. एका वर्षात आतापर्यंत हर्ष फाउंडेशनतर्फे 100 रक्तांच्या बॅग पूर्ण मोफत देण्यात आल्या असून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाच्या वेळी सुद्धा प्लाज्मावर खूप छान पद्धतीने काम झाले.

एका वर्षात जास्तीत जास्त गरजूंना 'हर्ष फाउंडेशन'च्या माध्यमातून १०० पिशव्या उपलब्ध देण्यात आल्या आहेत याचे समाधान मिळत असल्याची भावना अप्पासाहेब घोरपडे व्यक्त केली आहे.  

त्यांनी दिलेली प्रतिक्रिया

'हर्ष फाउंडेशन'चे पदाधिकारी, प्रतिष्ठान, सहकारी संस्था यांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. पराग शिळीमकर, मंगेश निपाणीकर, उमेश महाडिक, विजय मोहिते, दीपक घोरपडे, सुनील चिकने, सुधीर तनपुरे, राहुल फडतरे ,अमित चव्हाण ,जया परब, निखिल देशमुख कुमार सुहास देसाई, शिवले ,मयुरी कुडाळकर ,वैभव आवळे, निशा पाटील अक्षय भोईर, रेहाना शेख, सुधीर केपनार सचिन जगदाळे समीर घोडेकर, रेणू येळगावकर, वजिदा झारेकरी ,विजय जाधव ,वैभव तळेकर, निलेश देसाई, महेंद्र देवघरे ,निलेश दळवी ,दीपक नवघणे मीना शिंदे, सचिन जाधव,शुभांगी धायगुडे ,अजिता पाटील निखिल खैरे आदी असंख्य सहकाऱ्यांना सर्व श्रेय जाते. - अप्पासाहेब घोरपडे (संस्थापक, हर्ष फाउंडेशन)