मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ नेवासा येथे भव्य निषेध मोर्चा.
प्रतिनिधी :-संभाजी शिंदे नेवासा
यानिषेध मोर्चाला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा व डी वाय एस पी सुदर्शन मुंडे यांच्याकडे झालेल्या प्रकाराबाबत निषेध निवेदन देण्यात आले.
व लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली.
आज संपूर्ण तालुका भर कडकडीत बंद पाळण्यात आला.
परंतु दुपारनंतर माननीय मृदा व जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांनी व्यापारी व नागरिकांना आवाहन केले की कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून दुकान व आस्थापना उघडावी.
संपूर्ण तालुक्यातील जनतेचा प्रतिसाद पाहून त्यांनी नागरिकांचे ऋण व्यक्त केले.