उसाने भरलेला ट्रॅक्टर हॉटेल ग्रीन समोरील खड्ड्यामध्ये अडकला
राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे
राहुरी शहरातील हद्दीतील सचिन तनपुरे व राहुल तनपुरे या शेतकऱ्याचे उसाने भरलेले दोन ट्रेलर जात असताना हॉटेल ग्रीन समोरील

खड्ड्यामध्ये अडकून फसले दोन तास हे लोक जेसीबीची वाट पाहून होते पण रात्रीची वेळ असल्याकारणाने यांना कुठल्याही प्रकारचे जेसीबी मशीन मिळाले नाही ट्रॅक्टर रस्त्यामध्ये बसले असल्यास नगर मनमाड रस्त्यावरील वाहतूक कोंडी झाली होती
सुदैवाने याप्रसंगी कुठल्याही प्रकारची जीवेत हानी झाली नाही पण सध्या ऊस तोडणी चालू झाली असून ऊस वाहतूक करणारे वाहन दिसल्यास सावधानतेने चालावे कारण रस्ता अतिशय खराब आहे नागरिकांनी याची दक्षता घ्यावी कारण प्रशासनाला अजून या रस्त्यावरती किती अपघात बघायचे आहे
या रस्त्याची अवस्था अतिशय निंदनीय व निकृष्ट झाली असून कुठल्याही वाहनाला व्यवस्थित चालवता येत नाही याप्रसंगी संग्राम तनपुरे सागर ताकटे महेश तनपुरे उमेश तनपुरे अविनाश भुजाडे संभा खनसे या सर्व युवक मित्रांनी जेसीबी आणून हे ट्रॅक्टर असलेले बाहेर काढले
राहुरी शहर ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ या रोडची वाहतूक सध्या एकेरी पद्धतीने चालू असून तोही रस्ता खूप खराब आहे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी








