मल्हार सर्टिफिकेट चे स्वागतच_नितेश राणे यांना पाठिंबा_जेजुरी संस्थान.

मल्हार सर्टिफिकेट चे स्वागतच_नितेश राणे यांना पाठिंबा_जेजुरी संस्थान.

प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

मल्हार सर्टिफिकेट चे स्वागतच, जेजुरी संस्थान.

सविस्तर_मंत्री नितेश राणे यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी मल्हार सर्टिफिकेट असेल तरच मटण खरेदी करा असे आवाहन केले होते, आता नितेश राणे यांनी केलेल्या आवाहनाला जेजुरी संस्थान ने देखील पाठिंबा दिलाय, संस्थानने काढलेल्या निवेदणानुसार _ श्री मल्हार म्हणजेच श्री खंडेराया हे सबंध देश व महाराष्ट्रातील अखंड हिंदू समाजाचे कुलदैवत आहे. आणि प्रत्येक मल्हार भक्त हा आपल्या कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कुलदैवतेच्या साक्षीने व त्यांचे स्मरण करूनच करतो.

प्रसार माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्यांमधून असे निदर्शनास आले की, हिंदू समाजाद्वारे मांस मटण विक्रीसंदर्भात मल्हार सर्टिफिकेट योजना सुरु करण्यात येत आहे. यासबंधी श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्या माननीय विश्वस्त मंडळामध्ये साधक-बाधक चर्चा झाली व या निर्णयासंबंधी सर्व बाजूनी विचार करून माननीय विश्वस्त मंडळाने बहुमताने असा निर्णय घेतला की, या योजनेला मल्हार हे नाव देण्यास आपत्ती / आक्षेप असण्याचे कोणतेही कारण नाही, याउलट या निर्णयाचे आम्ही स्वागतच करत आहोत. माननीय विश्वस्त मंडळाच्या या निवेदनाद्वारे यासाबंधीची देवसंस्थानची भूमिका स्पष्ट करण्यात येत आहे. अशी भूमिका जेजुरी संस्थान ने काढलेल्या निवेदनाद्वारे जाहीर केलीय.


मंत्री नितेश राणे यांचा देवस्थान च्या वतीने सन्मान.

श्री मार्तंड देव संस्थान खंडोबा मंदिर जेजुरी व सर्व विश्वस्त मंडळाने मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन खंडोबाची काठी, घोंगडी, पगडी व खंडोबा देवाची प्रतिमा देऊन जेजुरी विश्वस्तानी, मंत्री नितेश राणे यांचा सन्मान केला, व हिंदुत्वाच्या कार्यास पाठिंबा दर्शविला.