तहसीलदार राहुरी यांचा बनावट गोल शिक्याचा वापर तसेच बनावट कागदपत्रावर सही करून फसवणूक करणाऱ्या इसमास राहुरी पोलिसांनी ठोकल्या 24 तासात बेड्या .

तहसीलदार राहुरी यांचा बनावट गोल शिक्का तयार करून, बनावट कागदपत्रावर सही करून फसवणूक करणाऱ्या इसमास राहुरी पोलिसांनी ठोकल्या 24 तासात बेड्या*
दिनांक 23/01/2025 रोजी नामदेव पाटील तहसीलदार राहुरी यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गु र नं 42/ 2025 कलम 336(3) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तहसीलदार नामदेव पाटील यांचा बनावट गोल शिक्का वापरून व बनावट कागदपत्रावर सही करून नागरिकांची व तहसील कार्यालयाची फसवणूक करणाऱ्या इसमास राहुरी पोलिसांनी अटक केली आहे .
सदर गुन्ह्यातील आरोपी नामे लक्ष्मण सोपान दळे वय-39 रा- कुंभार गल्ली राहुरी,ता- राहुरी याला पोलिसांनी त्याचे राहत्या घरून ताब्यात घेऊन दिनांक 24/01/2025 रोजी त्याला अटक केली असून, सदर आरोपीला मा.न्यायालयात हजर करून पाच दिवस पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार विजय नवले हे करीत आहे .
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे श्रीरामपुर , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे श्रीरामपुर उपविभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात , सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते,पोलीस हेड कॉन्स्टेबल- विजय नवले, संदीप ठाणगे, सुरज गायकवाड,राहुल यादव,पोलीस कॉन्स्टेबल-प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे,नदीम शेख नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर यांनी केलेली आहे.
तहसिलदार यांचा खोटा शिक्का व सही करणाऱ्या आरोपीस पोलीसांनी जेलवारी घडविली असली तरी या आरोपीबरोबर आजून कोणी या प्रकारे काम करत आहेत का ? याचाही तपास होणे गरजेचे आहे अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे .