श्रीगोंदा येथील फरार आरोपीस राहुरी पोलिसांनी शिताफिने धामोरी येथून घेतले ताब्यात .

श्रीगोंदा येथील फरार आरोपीस राहुरी पोलिसांनी शिताफिने  धामोरी येथून घेतले ताब्यात .

राहुरी प्रति - डॉ देवेंद्र शिंदे .

        श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी हा राहुरी तालुक्यातील धामोरी येथे लपून बसला होता .सदर आरोपी हा धामोरी येथे असल्याची माहिती राहुरी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ या आरोपीस शर्थीचे प्रयत्न करून ताब्यात घेतले असून त्यास श्रीगोंदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे .

        सदर घटनेची हकीगत अशी की ,श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजी नंबर 1041/2025 बी एन एस कलम 109 वगैरे प्रमाणे गुन्ह्यातील आरोपी नामे साहिल मच्छिंद्र चव्हाण वय 21 वर्षे राहणार मांडवगण तालुका श्रीगोंदा हा राहुरी पोस्ट हद्दीतील धामोरी खुर्द या गावात लपून बसल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने पोसई फडोळ, पोलीस हवालदार संजय राठोड, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र कांबळे अशांनी आरोपीचा शोध घेऊन त्याचा शिताफीने पाठलाग करून आरोपीस धामोरी खुर्द येथून आज दि. 17/12/2025 रोजी ताब्यात घेतले असून आरोपीची वैद्यकीय तपासणी करून श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .