आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाकडील केशर आंबा कलमांची विक्री सुरू .

आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाकडील केशर आंबा कलमांची विक्री सुरू .

*आंतरविदया शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाकडील केशर आंबा कलमांची विक्री सुरु*

*राहुरी विद्यापीठ, दि. 4 जून, 2024*

          महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी येथील आंतरविदया शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाकडील रोपवाटिकेत केशर आंबा कलमे रोपे विक्रीचा शुभारंभ विदयापीठाचे नियंत्रक श्री. सदाशिव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रथम रोपे खरेदीदार डॉ. सोपान नांदे मु. पो. पाचेगाव ता. नेवासा यांच्यासह बीड, छत्रपती संभाजीनगर आणि राज्याच्या अनेक भागातून शेतकरी आले होते. लोणी खुर्द ता. राहता येथील प्रगतशील शेतकरी श्री. जनार्दन चंद्रभान घोगरे, खांडवी ता. गेवराई जि. बीड येथील सौ. विदया तुळशीराम नाईकवाडे यांनी विदयापीठाची जोमदार आंबारोपे व विक्रीव्यवस्था याबददल समाधान व्यक्त केले. रोपांच्या विक्रीबरोबरच विभागामार्फत आंबा उत्पादनाविषयी तांत्रिक मार्गदर्शन देखील केले जात आहे. तसेच विभागाकडील गांडूळ खत हाताळणी योग्य पॅकिंग मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. महानंद माने यांनी दिली. रोपे विक्रीच्या माध्यमातुन शेतकर्यांना होत असलेल्या सुविधेबरोबरच विदयापीठाच्या महसुली उत्पन्नामध्ये देखील भरीव वाढ होत असल्याबददल नियंत्रक श्री. सदाशिव पाटील यांनी डॉ. महानंद माने आणि त्यांच्या विभागातील सहकार्यांंचे अभिनंदन केले. यावेळी नियंत्रक श्री. पाटील यांनी या विभागाच्या सिंचन उदयानास भेट देऊन सविस्तर तांत्रिक माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. याप्रसंगी या विभागाचे श्री. शरद बेल्हेकर, श्री. दत्तात्रय कदम, श्री. शेषराव देशमुख आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.