बालाजी देडगाव येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव संत रोहिदास देवस्थानच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
प्रथमता राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांची सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली .
यावेळी श्री संत रोहिदास देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष बन्सी भाऊ एडके यांनी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या बद्दल यांच्या बद्दल विशेष माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले .त्याचबरोबर पत्रकार युनुस पठाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थान म्हणून माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे हे लाभले .
या कार्यक्रमास माजी चेअरमन योसेफ हिवाळे ,पप्पू वाढेकर ,सुधाकर , नांगरे,बबनराव तांबे फकीरचंद हिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार संत रोहिदास देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके यांनी मान
ले .