देडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.
बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी ह भ प सुखदेव महाराज मुंगसे होते तर प्रास्ताविक संस्थेचे सचिव रामकिसन तांबे बोलताना म्हणाले की, या वर्षी लाभांश (डीव्हीडन )रक्कम 31 लाख 65 हजार रुपये वाटणार आहे. तरी यावर्षीची उलाढाल 23 कोटी 85 लाख इतकी असून या संस्थेला नफा 1 कोटी 7 लाख रुपये एवढा मिळाला असून एकूण सभासद संख्या 2805 आहे.
यावेळी संस्थेचे नूतन
अध्यक्ष रामदास तांबे यांनी यावर्षी 15% लाभांश वाटप सभासदांना मिळणार आहे .अशी घोषणा केली. यानंतर ए डी सी सी बँकेचे माजी इनस्पेक्टर भाऊसाहेब लक्ष्मण मुंगसे साहेब यांचा सेवानिवृत्ती बद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या सभासदांना संस्थेच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी सेवा संस्थेचे नूतन उपाध्यक्ष भिऊबाई रामनाथ गोयकर व मा. अध्यक्ष बाबासाहेब हरिभाऊ मुंगसे, संचालक कचरू बाबुराव तांबे ,रामेश्वर कारभारी गोयकर, सुनीता जनार्दन देशमुख, संजय बाजीराव मुंगसे, महेश लक्ष्मण कदम ,संदीप देवराव कुटे, रामभाऊ नाथा कोकरे ,अरुण बन्सी मुंगसे, गंगासागर मनोहर बनसोडे, योसेफ दाविद हिवाळे तर सरपंच चंद्रकांत मुंगसे, बालाजी देवस्थान अध्यक्ष नवनाथ मुंगसे, माजी उपसरपंच दत्ता मुंगसे, बन्सीभाऊ कुलट ,रामभाऊ कुटे, कारभारी मुंगसे, संभाजी काजळे ,उद्धव मुंगसे, कडूभाऊ तांबे, एकनाथ तांदळे, बुधाजी गोयकर ,निलेश कोकरे, भाऊसाहेब मुंगसे ,खंडेश्वर नजन, लक्ष्मणराव गोयकर, नामदेवराव वांढेकर, मच्छिंद्र कुटे, भास्कर शेजुळ, रेवन्नाथ तांबे, गिरजू गोयकर, जनार्धन देशमुख, रामनाथ गोयकर तर संस्थेचे कर्मचारी गोरख देवकाते ,हरिभाऊ गोफने, गणेश सुसे ,राजेंद्र अंबाडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरी या कार्यक्रमाचे आभार माजी अध्यक्ष बाबासाहेब हरिभाऊ मुंगसे यांनी मानले.