श्रीराम विद्यालयाचे विविध क्रीडा स्पर्धेत सुयश.
श्रीराम विद्यालयाचे विविध क्रीडा स्पर्धेत सुयश.
भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी,
शेवगाव: क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मलाताई काकडे आश्रम शाळा मंगळूर ता.शेवगाव येथे दिनांक १२ सप्टेंबर रोजी शालेय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये श्रीराम विद्यालय ढोरजळगाव ता.शेवगाव वयोगट १९ वर्ष मुलांच्या संघाने हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.व तसेच जिल्हास्तरावर संघाची निवड झाली. त्याचप्रमाणे दिनांक ६ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा वयोगट १४ वर्ष व १७ वर्ष मुलीं त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल शेवगाव या ठिकाणी पार पडल्या. त्यामधे श्रीराम विद्यालयाच्या मुलींनी कबड्डी स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला.वयोगट १७ वर्ष मुलींच्या संघाचा तृतीय क्रमांक आला. तसेच दिनांक १५सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा त्रिमूर्ती शैक्षणिक क्रीडा संकुल नेवासा फाटा येथे घेण्यात आल्या. यामधे वयोगट १४ वर्ष व १७ वर्ष मुलांच्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत,उंबरे विशाल मोहन.इ ८ वी,वयोगट १४ वर्ष,वजन गट ४४ किलो,गटात द्वितीय क्रमांक मिळवला.चि.फुलमाळी आर्यन शिवाजी,इ ९ वी वयोगट १७वर्ष, वजन गट ५५ किलो,या गटात द्वितीय क्रमांक मिळवला.
वरील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक राम काटे व सुरेश भापकर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच सर्व खेळाडूंचे कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड.डॉ.विद्याधरजी काकडे साहेब व जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदाताई काकडे तसेच संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंग भैय्यासाहेब काकडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण बिटाळ,विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे व पर्यवेक्षक सुनील जायभाये,संस्था प्रतिनिधी सुरेश तेलोरे,जेष्ठ शिक्षक भाऊसाहेब टाकळकर, सुधाकर आल्हाट व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांचे अभिनंदन केले
.