चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलमध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवा कार्यशाळा संपन्न.
*चाईल्ड करिअर इंग्लिश स्कूल मध्ये पर्यावरण पुरक गणेश मूर्ती बनवा कार्यशाळा संपन्न*
नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये शाडू माती पासुन पर्यावरण पुरक गणेश मूर्ती बनवा कार्यशाळा आयोजित केली होती.स्कूल च्या कला विभागाने आयोजित केलेल्या पर्यावरण रक्षण,संवर्धन कामात सक्रिय असलेल्या शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.सदर कार्यशाळेसाठी उपक्रमशील कलाशिक्षक श्रीमान संदीप आदमाने,श्रीमान नवनाथ साळवे,श्रीमान आगरकर यांनी शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवले.पर्यावरण रक्षणासाठी मुलांना मार्गदर्शन केले. शाडू माती चा गणपती बाप्पा बनून दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध आकाराच्या सुंदर गणेश मूर्ती साकारण्यात रममाण झाले होते.आपल्या स्वहस्ते बनवलेल्या सुंदर गणेश मूर्ती बनविल्याचां आनंद मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
सदर कार्यशाळेत संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गणेश मूर्ती च्या पोटात विविध झाडांच्या बिया ठेवण्यात आल्या.तसेच या मूर्तींना इको फ्रेंडली रंगकाम करण्यात आले.याच मूर्तींची गणेश उत्सवात स्थापना करावी . विसर्जनाच्या दिवशी एक खड्डा खोदून त्यात पाणी भरून त्यात या मूर्तीची विसर्जन करावे. विसर्जनानंतर गणपतीच्या पोटात असलेली बिचे रोपटे उगवेल.त्याचे संवर्धन करावे.असा संदेश देण्यात आला.
पर्यावरणाचे रक्षण, वृक्षांचे संवर्धन,कला निर्मितीचा आनंद हे सर्व हेतू यातून साध्य होतील.व त्याचे आत्मिक समाधान मिळेल.असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर बनसोडे यांनी केले.
सदर कार्यशाळेसाठी उपक्रमशील कलाशिक्षक श्रीमान संदीप आदमाने,नवनाथ साळवे, यांचेसह संदीप खाटीक,संजय गरुटे, विजय खाटीक, शहारुख सय्यद,अमोल इंगळे, अभिजित अरगडे, शिक्षिका छाया सातपुते,स्वाती वरणे, रेणुका गोरे, श्रीमती लिंबे, श्रीमती दळवी शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत
आहे.