श्री . शाहू विद्यालयाची विद्यार्थिनी प्रणाली कल्हापुरे हिस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते अॅक्सिस ग्रामीण लिमिटेड गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान .
श्री.शाहू विद्यालयाची विद्यार्थिनी प्रणाली कल्हापूरे ही ॲक्सिस ग्रामीण लिमिटेड गुणवत्ता शिष्यवृत्तीने सन्मानित ; जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान..!!
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज- श्री शाहू विद्यालय खडांबे यांच्या वतीने सत्कार..!!
राहुरी (खडांबे) : क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण लिमिटेड यांच्या वतीने दिली जाणारी गुणवत्ता शिष्यवृत्ती यावर्षी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अहमनगर यांचे विद्यालय- श्री शाहू विद्यालय खडांबे ता. राहुरी या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी प्रणाली संजय कल्हापूरे या विद्यार्थिनीला देण्यात आले. अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हा सत्कारसमारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.
यावेळी पालकांच्या वतीने आई सौ. अनिता संजय कल्हापुरे, वडील संजय कल्हापुरे, सौ. मनीष हेमंत मोरे आदींची उपस्थिती होती. या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून संस्थेच्या उपक्रमाची प्रशंसा केली.
ग्रामीण भागामधील विविध गुणवत्ता वाढीस लागावी त्यादृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. संपूर्ण जिल्ह्यामधून ही शिष्यवृत्ती दोनच विद्यार्थिनींना देण्यात आली. त्यापैकी प्रणाली संजय कल्हापूरे हीला या
शिष्यवृत्तीचा लाभ रक्कम रुपये ८०,०००/- असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप असून चाळीस हजार रुपये चालु वर्षीचे तिच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहेत.
अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव मा.खानदेशी साहेब, विश्वस्त श्री.जयंत वाघ साहेब तसेच क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण लिमिटेड यांच्या वतीने विभागीय अधिकारी मा.सुधीर लोणे साहेब, क्षेत्रीय अधिकारी मां. दिपक राऊत यांच्याही हस्ते या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज- श्री शाहू विद्यालय खडांबे येथील मुख्याध्यापक मा. श्री.देशमाने सर,पर्यवेक्षक श्री. नरोडे सर, शिक्षक नेते श्री.आप्पासाहेब शिंदे सर, श्री.संजय रोकडे सर,श्री. अविनाश रामफळे सर, श्री.संदीप बांगर सर, श्री.राहुल जाधव सर, श्री.गणेश कुर्हे सर, श्री.प्रसाद साठे सर, श्री. सिकंदर सय्यद, श्री.संतोष कारले, श्री. थोरात जी. आर,मेहत्रे, बाळासाहेब आदी. शिक्षकांनी या गुणवंत विद्यार्थ्यांनीचा सत्कार करून तिच्या या यशाबद्दल कौतुक, आणि अभिनंदन केले .