मांजरी येथील 67 वर्षीय महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा पोलिसांनी चार तासात लावला शोध .

मांजरी येथील 67 वर्षीय महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा पोलिसांनी चार तासात लावला शोध .

*मांजरी येथील 67 वर्षीय महिलेच्या खुनाच्या गुन्हाचा तत्काळ चार तासात पोलिसांकडून शोध*

 

               मौजे मांजरी ता राहुरी येथील सौ सुमनबाई सावळेराम विटनोर वय 67 ह्या दिनांक 11/8/2024 रोजी पासून घरातुन शेतात फिरण्यासाठी गेले असता ते पुन्हा आले नाही त्यामुळे नातेवाईकांनी इतरत्र शोध घेऊन दिनांक 12/8/2024 रोजी सायंकाळी राहुरी पोलीस स्टेशन येथे खबर देऊन मिसिंग दाखल करण्यात आली होती. दि.13/8/2024 रोजी अंबादास चोपडे यांच्या शेतामध्ये मृत अवस्थेत मिळून आली. सदर मृतदेह खून करून टाकल्याचा संशय वाटल्याने तात्काळ तपास करून आरोपी नामे संदीप उर्फ संजय अशोक चोपडे वय 35 रा.मांजरी यांना तात्काळ गुन्हामध्ये अटक करण्यात आले आहे. आरोपीने गुन्हाची कबुली दिली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील व पोहेका विकास साळवे हे करत आहे.

      

 

          सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो, अहमदनगर, मा. वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर श्री दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी , सपोनी परदेशी, सपोनी पिंगळे, पोसई चारुदत्त खोंडे, पोसई धर्मराज पाटील, पोसई समाधान पडोळ, पोहेका विकास साळवे, सुरज गायकवाड , राहुल यादव,अशोक शिंदे, अमित राठोड, राधिका कोहकडे, प्रवीण बागुल, संदीप ठाणगे नदीम शेख, सचिन ताजने, दीपक फुंदे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, आजिनाथ पाखरे गोवर्धन कदम, दिगंबर सोनटक्के चालक जालिंदर साखरे, शकुर सय्यद, उत्तरेश्वर मोराळे ईतेकार सय्यद, उत्तर मोबाईल सेलचे , संतोष दरेकर,सचिन धनाड यांनी सदरची कारवाई केली आहे .